Gopichand Padalkar: गावच्या पारावर सुद्धा शोभणार नाहीत अशा शिव्या विधानसभेच्या प्रांगणात देणाऱ्या भाजप आमदार गोपीनाथ पडळकर यांची शिवराळ भाषा महाराष्ट्रासाठी काहीच नवीन नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी असूनही अत्यंत गलिच्छ भाषा विरोधकांना वापरणाऱ्या गोपीचंद पडळकरांवर पार्टी विथ डिफरन्स असे सांगणाऱ्या भाजपने आजवर कोणतीच कोणतीच कारवाई केलेली नाही. विधानसभेच्या प्रांगणामध्येच काल अभूतपूर्व असा राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचा सराईत गुन्हेगार असलेला गावगुंड कार्यकर्ता ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीनं महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेनं खाली गेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा सुद्धा वेशीवर टांगली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेमकं सुरू आहे तरी काय? अशी विचारणा सर्वसामान्यांमधून होत आहे. 

Continues below advertisement






पडळकरांचा गावगुंड कार्यकर्ता, सांगलीत गुन्ह्यांची मालिका


दरम्यान नितीन देशमुख यांच्यावर हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा सुद्धा करण्यात येत आहे. हा कार्यकर्ता अट्टल गुन्हेगार असल्याचं त्याच्या गुन्हेगारी कुंडलीवरून दिसून येत आहेत सांगलीतील सराईत गुन्हेगार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हेगारी केसेस आहेत. ऋषी ऊर्फ सर्जेराव बबन टकले (रा. माळवाडी, जि. सांगली) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात खुनी हल्ला, मारामारी, विनयभंग, सरकारी कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी एमपीडीए कायद्यानुसार (झोपडपट्टीदादा) कारवाई करण्यात आली आहे. हाणामारीमध्ये इतरही संशयित गुन्हेगारांचाही सहभाग असल्याची माहिती आहे. 






आव्हाडांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ 


दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरु आहे. पवार कुटुंबीयांवर अत्यंत बेलगाम पद्धतीने पडळकरांनी टीका केल्यानंतर विधानसभेच्या प्रांगणात आव्हाड यांनी पडळकर मंगळसूत्र चोराचा असे म्हणत घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर गाडीवरूनही दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी पडळकर यांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरली होती.






इतर महत्वाच्या बातम्या