मुंबई : कोरोनाच्या काळात 12 आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार धरता. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना 12 आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे,  यांना राजकारणाचा महारोग जडला आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.


आशिष शेलार यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्या टीकेचाही समाचार घेतला. भूत आणि भूताटकी ही नेमकं कसली वक्तव्य आहेत? रोज नुसतं 12-12 ची टिमकी वाजवली जातेय. तुमचे काय 12 वाजलेत का? भुतानं जर फाईल पळवल्याचं तुमचं म्हणणं असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काहीही आज करत नाहीय. पण भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे राऊत यांनी लक्षात ठेवावं, असा जोरदार टोला आशिष शेलार यांनी लगावला.


राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्यास सुरूवात


बार्ज दुर्घटना प्रकरणी शपूरजी पालनजीवर गुन्हा दाखल करा


अखिल भारतीय नाविक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफकॉन्सचे संचालक मंडळ आणि शापूरजी पालनजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी तक्रार त्यांनी केली. शिष्टमंडळामध्ये  अखिल भारतीय नाविक संघटनेचे अध्यक्ष सुहास माटे, कार्याध्यक्ष अमोल जाधव, सरचिटणीस दिनानाथ जगाडे, उपाध्यक्ष जितेंद्र राऊत आणि राकेश चव्हाण यांच्यासह कामगार नेते मिलिंद तुळसकर यांचा यामध्ये समावेश होता.


या प्रकरणात शापुरजी पालनजी यांच्या संचालकना वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील कुठला मंत्री त्यासाठी प्रयत्न करीत आहे? असा सवालही याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार आशिष शेलार यांनी केला. या प्रकरणी कंपनीच्या डायरेक्टर का वर गुन्हा नाही. जो हजर नाही आपली बाजू मांडू शकत नाही अशा कॅप्टनवर गुन्हा दाखल केला गेला. हा डाव कुठल्या मजल्यावर शिजला हे मुख्यमंत्री यांनी सांगावे, असा आरोपही त्यांनी केला आहे.