पुणे : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. यासंदर्भात आज पुण्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


ते म्हणाले की, मला कुठले संकेत मिळालेले नाहीत. एवढ्या रात्री का भेट घेतली माहिती नाही. आम्हाला अशा काही सूचना वरिष्ठांकडून आल्या की त्या मानायच्या असतात. त्यामुळे अमित शाह व अध्यक्षांची भूमिका मान्य असेल, असं ते म्हणाले. अशा भेटी होत असतात. महाराष्ट्रात या कमी झाल्या. अशाप्रकारची भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही. पण दोघे तिकडे होते. अर्थात याबाबत अधिकृत माहिती मात्र नाही. अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात, असंही ते म्हणाले.


शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत चुकीचं काही नाही : संजय राऊत


चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत यांना सरकार टिकेल हे सांगावे लागते म्हणजे काही तरी गडबड आहे. शरद पवार अमित शाह भेटीवर बोलताना ते म्हणाले की, अशाप्रकारच्या भेटी होतच असतात. यात नवीन काही नाही. अमित शाहांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी असे वाटते. शरद पवार आणि अमित शाह यांची भेट खूप निवांत झाली. ही भेट का झाली याबद्दल मी देखील अनभिज्ञ आहे, असं ते म्हणाले.


गुजरातमध्ये शरद पवारांच्या गुप्त भेटीमागचा नेमका अर्थ काय? भेट नेमकी कुणासोबत?


पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आज पोलीस आयुक्तांची दोन कारणांनी भेट घेतली. हॅप्पी कॉलनीतील गोसावी वस्तीतील लोकांना त्रास होत होता.त्यासाठी तिकडे एक पोलीस चौकी व्हावी ही मागणी केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाला लॉकडाऊन हा पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू, असंही ते म्हणाले. ते म्हणाले, लोकांनी व्यवहार सुरू केले आहेत. रात्रीची संचारबंदी ठीक आहे. राज्यात कोरोना टेस्टिंग सेंटर वाढवाव्या लागतील, असंही ते म्हणाले. 


'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत', शरद पवारांसोबत बैठकीसंदर्भात अमित शाहांचं सूचक वक्तव्य


चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार हे आजारी असल्याचं  नवाब भाईंकडून कळलं. महाराष्ट्राची कुलदैवता तुळजाभवानीला प्रार्थना करेन की त्यांना लवकर आराम मिळू दे, असंही ते म्हणाले.


Sanjay Raut | शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांची बॅटिंग