CORONAVIRUS UPDATES | पंतप्रधान मोदी उद्या रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधणार, कोरोनासंदर्भात करणार मोठी घोषणा

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Mar 2020 11:36 PM
सीबीएसईचे 19 मार्च ते 31 दरम्यान असलेले दहावी आणि बारावीचे सर्व पेपर रिशेड्युल
सीबीएसईचे 19 मार्च ते 31 दरम्यान असलेले दहावी आणि बारावीचे सर्व पेपर रिशेड्युल
LIVE : पंतप्रधान मोदी उद्या रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधणार, कोरोनासंदर्भात करणार मोठी घोषणा
पुण्यात उद्यापासून आयटी सेक्टरमध्ये 100 टक्के वर्क फ्रॉम होमची अंमलबजावणी होणार, आयटी कंपन्यांमध्ये पोलीस पाठवून अंमलबजावणी केली जाणार
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर, रत्नागिरीत दुबईहून आलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण
मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले, पुण्यातील कोरानाग्रस्तांचा आकडा 19 वर तर मुंबईतील आकडा 8 वर, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44 वर
उद्यापासून मुंबईतील महत्वाच्या 50 टक्के रस्त्यांवरील दुकाने बंद ठेवण्याचे महापालिका आयुक्तांचा आदेश, एकदिवसाआड मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी लॉकडाऊन, गर्दीच्या ठिकाांवरील शॉपिंग सेंटर्स, मार्केट बंद राहणार
लोकलच्या फेऱ्या कोणत्याही प्रकारे कमी केल्या जाणार नाहीत, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सूत्रांची माहिती, प्रवासी कमी करण्यावर भर दिला जाईल

कोरोन्टाईन केलेल्या व्यक्तींनी पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करावा की नाही याचा अभिप्राय मागविणार, जिल्हाधिकारी कैलास शिंदे स्पष्टीकरण, जर्मनीतून आलेल्या चार जणांना कोरोन्टाईन केल्यानंतर रेल्वेने प्रवास करत असतानाचा प्रश्न उद्भवल्याने मागविणार अभिप्राय
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 19 वर, फिलिपाईन्सहून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण
coronavirus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील काम 31 मार्चपर्यंत बंद, केवळ BS4 आणि नवीन वाहन नोंदणीचे काम सुरु राहणार, जिल्ह्यातील नियोजित शिबीर कार्यालयांची कामं देखील रद्द
LIVE : मुंबईतून तब्बल एक कोटी रुपयांचं सॅनिटायझर जप्त, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई, मुंबईतल्या नाहूर भागात कारवाई, तर तिकडे नागपूरमध्येही बनावट सॅनिटायझरच्या एक हजार बाटल्या जप्त करण्यात आल्यात
LIVE : मुंबईतून तब्बल एक कोटी रुपयांचं सॅनिटायझर जप्त, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई, मुंबईतल्या नाहूर भागात कारवाई, तर तिकडे नागपूरमध्येही बनावट सॅनिटायझरच्या एक हजार बाटल्या जप्त करण्यात आल्यात
मुंबई : कोरोनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली आढावा बैठक, बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी हजर, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशीही मुख्यमंत्री करणार चर्चा, परिवहन, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र लॉकडाऊन म्हणजेच बाजार आणि इतर गर्दीचे ठिकाण बंद करण्याचे विचार सुरु आहे. गर्दी कमी करण्यासाठी खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, संकटाच्या या काळात पोलीस दलाला सुट्टी मिळणे अत्यंत दुरापास्त आहे. अशा वेळी नागपूर पोलिसांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी त्यांची कंबर कसली आहे. नागपुरात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कोरोनासोबत लढा देण्यासाठी विविध उपाय योजले गेले आहे. पोलीस स्टेशनमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क वापरण्यास सांगण्यात आले आहे. आपल्या समस्येसाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांना/तक्रारदारांना पोलिसांमुळे आणि पोलिसांना नागरिकांमुळे संसर्ग होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे सध्या नागपूरच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. त्याशिवाय नागपूर पोलिसांनी पोलीस स्टेशन मधील गर्दी कमी करण्यासाठी घटनास्थळी किंवा तक्रारदाराच्या घरीच जाऊन जबाब घेणे सुरु केले आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनमधील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात यश आले आहे. त्यामुळे गुन्हेगार आणि समाजकंटकांसोबत लढा देणारे पोलीस सध्या कायदा सुव्यवस्था सांभाळताना कोरोना या विषाणूंसोबत ही युद्ध लढत आहेत. 
बी जे मेडिकल कॉलेजमध्ये देखील उद्यापासून टेस्टिंग सुरु करण्यात येणार, दररोज अडीचशेच्या आसपास सॅम्पल्स टेस्ट होतील; तर हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये देखील येत्या दोन दिवसांत टेस्ट सुरू होतील : : आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जीएसटी भवनमध्येही प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरातून व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात विबोध कामांसाठी या जीएसटी भवनात गर्दी करत असतो. व्यापाऱ्यांच्या सुनावण्या, असेसमेंट, ऑडिट सबमिशन्स यासाठी व्यापाऱ्यांसह सीए, वकील आणि प्रसिटीशनर्सची वर्दळ असते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून जीएसटी भवनातील कर्मचारी वगळून इतर सर्व मंडळींना प्रवेश निषिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र 31 मार्च फायनान्शियल इअर एन्डिंग असल्याने व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पण व्यापाऱ्यांना ई-मेल आणि इलेक्ट्रॉनिक सबमिशन्स ग्राह्य धरले जातील, अशी ग्वाही जीएसटीचे जॉईंट कमिशनर नितीन शालीग्राम यांनी दिली आहे. त्यामुळे जीएसटी भवनात न जाता व्यापाऱ्यांना त्यांची कामं पूर्ण करता येणार आहेत.
तीन ठिकाणी उद्यापासून लॅब सुरु, NIV कडून मिळणार उपकरणं : आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात आठ ठिकाणी तपासणी लॅब सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद लाईव्ह
मुंबईत रस्त्यावर थुंकाल तर आता तुम्हाला तब्बल एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. पूर्वी मुंबईतल्या रस्त्यावर थुंकल्यास दोनशे रुपये दंड होता. आता त्यात वाढ करण्यात पाचपटीनं वाढ कऱण्यात आली आणि हा दंड एक हजार रुपये करण्यात आला आहे.
क्वारंटाईन करण्यात आलेल्या संशयित रुग्णांचा चक्क रेल्वेतून प्रवास, गरीबरथ एक्स्प्रेसला पालघरमध्ये थांबा देऊन रुग्णांचं विलगीकरण
महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणारे 17 विद्यार्थी फिलिपिन्समधील मनिला शहरात अडकले आहेत. यामध्ये अकोल्यातील 10 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मनिला शहरातील आमा मेडीकल कॉलेजमध्ये हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. कोरोनामूळे मनिला शहर बंद करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे भारतीय दुतावासाशी संपर्कात आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस उपनिरीक्षपदासाठी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी पात्र उमेदवारांनी केली आहे. येत्या 20 तारखेपासून अमरावती इथे ही चाचणी होणार आहे.
जर्मनीवरुन परतल्यानंतर क्वॉरन्टाईन केलेल्या चार रुग्णांचा रेल्वेतून प्रवास, सहप्रवाशांनी चौघांच्या हातावरील स्टॅम्प पाहिल्यानंतर मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर त्यांना उतरवलं
नेदरलॅंड आणि फ्रान्सहून प्रवास करून आलेली पुण्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 गेली आहे. ही महिला 15 मार्चला पुण्यात पोहचली आणि 17 मार्चलातपासणी झाली असता तीला नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. काल रात्री उशीरा तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.


जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे 7 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील 24 मार्च रोजी होणारी भैरवगड यात्रा रद्द करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी सातगांव मंडळाने हा निर्णय घेतला आहे. संगमेश्वर, कसबा आणि फणसवने येथे होणारा शिंपणे उत्सवही साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर इतिहासात प्रथमच बंद ठेवण्यात आलं आहे. एवढचं नाहीतर कोकणातील शिमगोत्सवातही कोरोना इफेक्ट दिसून येत आहे. पारंपरिक गाणी म्हणत कोरोनाचा नायनाट करण्याचे ग्रामदेवतेला साकडं घातले जात आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेलवेने काही लांब पल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे अनेकांची तारांबळ तर उडलीच आहे मात्र यामुळे अनेकांनी आपल्या घरी जायची वाट पकडली आहे. अनेक जण आता आपल्या घरी बाहेर राज्यात निघायला त्यांनी सुरवात केल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे जे मुंबईत बाहेर राज्यातून आले आहेत ते मात्र योग्य ती खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत.

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...


मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी होईल असे स्पष्ट निर्देश असतानाही एका नव्या याचिकेचा उल्लेख केल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका याचिकादाराला पंधरा हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. तर न्यायालयातील गर्दी वाढू नये म्हणून न्यायमूर्ती ए.के. मेनन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिका सादर करण्याची अभिनव सूचनाही जारी केली आहे.


मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सध्या कोरोनाच्या वातावरणामुळे केवळ दोन तास सुरू आहे. केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्याचे न्यायालयाकडून निश्‍चित केलेले असतानाही न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यापुढे एक न्यायालयाच्या अवमानासंबंधित याचिकेचा उल्लेख करण्यात आला. याबाबत न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. वेळ आणि गर्दी वाढू नये, म्हणून नोटीस जारी केली असतानाही अशा प्रकरणांचा उल्लेख का केला जातोय?, असा सवाल करत संबंधित याचिकादाराला पंधरा हजार रुपयांचा दंड सुनावला.

दंडाची ही रक्कम सेंट ज्यूडस इंडिया चाईल्डकेअर सेंटरला देण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. त्याचबरोबर न्यायमूर्ती ए. के. मेनन यांनी कोर्टातील गर्दी कमी करण्यासाठी तूर्तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीच्या याचिकेचा उल्लेख करण्याची सूचना वकिलांसाठी जारी केली आहे. न्यायालयच्या नव्या इमारतीतील कोर्ट रूम क्रमांक 16 ब मध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आली असून वकिल त्यांच्या घरातून किंवा कार्यालयातूनही याचा लाभ घेऊ शकतात. एका व्हिडीओ सॉफ्टवेअर मार्फत ही सुविधा उपलब्ध असून त्यासाठी पिन क्रमांक, पासवर्ड व त्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.