मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपने (BJP)  कंबर कसली आहे. पवारांचं प्राबल्य असलेल्या बारामतीवर भाजपने विशेष लक्ष दिले आहे. 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर जाणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा आढावा घेणार आहेत.


आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. या मिशनची सुरुवात पवाराचे प्राबल्य असलेल्या बारामती येथून झाली आहे.  महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघांत केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत त्या अंतर्गत निर्मला सीतारामन बारामतीला जाणार आहेत.  तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा 11 ते 13 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 


भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. 


कोणकोणत्या जागांवर भाजप लक्ष देणार?


बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले


लोकसभा मिशन 45 साठीचे भाजपचे शिलेदार कोण?  
 
भाजपने 12 प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली आहे.  प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ असं हे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते आहेत. 


   
दक्षिण मध्य मुंबई - प्रसाद लाड


 दक्षिण मुंबई - संजय उपाध्याय


कल्याण - संजय केळकर 


 पालघर - नरेंद्र पवार
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - आशिष शेलार 
    
हिंगोली - राणा जगजीतसिंग


बुलडाणा - अनिल बोंडे
 
शिर्डी - राहुल आहेर,  


कोल्हापूर - सुरेश हळवणकर, 


हातकणंगले - गोपीचंद पडळकर  


भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मोदींची प्रत्येक योजना ही सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आता इतर पक्ष आपलं गणित कसं लावतात आणि हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.