मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावरून शरद पवारांवर हल्लोबोल केला आहे. शरद पवारांनी केलेलं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी नाही, तर भगवान रामविरोधी आहे, असं माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेते उमा भारती यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले काम इमानदारीने करतात. जर भगवान रामांसाठी त्यांनी दोन तास दिले, तर काही बिघडणार नाही, असं उमा भारती यांनी म्हटलं. शिवसेनेने हिंदुत्वाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आता भाजपकडून होत आहे.


शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मंदिर बांधल्याने कोरोना जाणर नाही ये देशाला माहित आहे. देशातील जनता सुज्ञ आहे. यावर अधिक बोलायची गरज नाही. मात्र मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही, तर आपल्या राज्यात मंत्र्यांना नव्या गाड्या दिल्याने कोरोना जाणार आहे का? शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने कोरोना जाणार आहे का? असा सवाल मुनगंटीवार यांनी शरद पवारांना विचारले. प्रत्येक गोष्टीचं राजकरण व्हायला नको असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.


काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला


माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवाराना प्रत्युत्तर दिलं. पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात राष्ट्रवादीला त्रास होण्यासारखं काय? असा प्रश्न भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.


काय म्हणाले होते शरद पवार?


कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं होते. कोरोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटाता सापडलेल्या लोकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, त्याबाबत मला माहिती नाही. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं.


संबंधित बातम्या




Ram Mandir | मंदिर श्रद्धेचा विषय, राजकारण नको, शरद पवारांच्या राम मंदिराच्या टोल्यावरून मुनगंटीवारांचं उत्तर