सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दर मागणीसाठी 21 जुलै रोजी राज्यभर दूध बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर राजू शेट्टींच्या या दूध आंदोलनावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजु शेट्टींवर जोरदार निशाणा साधला आहे.


राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे, नाटक असून, हे दूध आंदोलन मॅच फिक्सिंग असल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच बारामतीला आमदार होण्यासाठी जातात, पण दुधाच्या दरासाठी जाणे जमत नाही, असा टोलाही खोत यांनी राजू शेट्टींनी लगावला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.


दूध दरावरून राजू शेट्टीच्या उद्याच्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंग सारखे दूध फिक्सिंग आहे. शेट्टी बारामतीला आमदार होण्यासाठी जातात. पण दुधाच्या दरासाठी त्यांना जायला जमत नाही. शरद पवारांच्याकडे शेट्टी यांनी दुधाच्या योग्य दराची का मागणी केली नाही, एकीकडे सरकारमध्ये राहायचे आणि दुसरीकडे सरकार विरोधात आंदोलनचे नाटक करायचा उद्योग शेट्टी करत आहेत, असे म्हणत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी याचे दूध आंदोलन सुरु होण्याआधीच टीकास्त्र सोडलं आहे.


16 जुलै रोजी दुग्धविकास खात्याने 21 जुलै रोजी दुग्ध विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत दूध दराबाबत बैठक असल्याचे राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनाना पत्राद्वारे कळवले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देखील त्या बैठकीच्या निमंत्रणचे पत्र 16 तारखेला गेले होते. म्हणजे, एका बाजूला 16 तारखेला सरकार राजू शेट्टी यांना दुधाच्या बैठकीबाबत निमंत्रण देतात आणि राजू शेट्टी 17 तारखेला दूध दरावरून 21 जुलै रोजी आंदोलनाची घोषणा करतात. म्हणजे एका बाजूला दुग्धविकास खात्याची बैठक ज्या दिवशी आहे त्याच दिवशी याचे आंदोलन आहे. म्हणजे एकप्रकारे हे मॅच फिक्सिंगसारखे दूध फिक्सिंगचा प्रकार आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले. राजू शेट्टींनी आता खरंतर आंदोलन करायला नाही पाहिजे. कारण ते सरकारमध्ये घटक पक्ष आहेत. शेट्टी बारामतीला शरद पवारांकडे आमदारकी मागायला गेले.


पाहा व्हिडीओ : राजू शेट्टींनी पुकारलेल्या आंदोलनाला गोकूळ दूध संघाचा पाठिंबा; दुग्ध विभागाची गोकूळला नोटीस



त्यामुळे शेट्टीना पवारांकडे दुधाचा दर मागायला काय अडचण होती. शरद पवारांच्याकडे शेट्टी यांनी दुधाच्या योग्य दराची का मागणी केली नाही, एकीकडे सरकारमध्ये राहायचे आणि दुसरीकडे सरकार विरोधात आंदोलनचे नाटक करायचा उद्योग शेट्टी करत आहेत. जर शेट्टी आणि पवार यांच्याकडे दुधाच्या दराची मागणी केली असती तर शेतकऱ्यांना आपला शेतकरी नेता आहे असे वाटले असते असेही खोत म्हणाले.


दूध दर वाढ करावी यासाठी आज सदाभाऊ खोत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तसेच राज्य सरकार ने दूध दर वाढ जर नाही केले तर राज्यात संपूर्ण दूध बंद आंदोलन केले जाणार असल्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारला इशारा दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्ष रस्त्यावर, उद्या मंत्रालयात बैठक


'गणेशोत्सवासाठी 7 ऑगस्टपर्यंत या, अन्यथा 1000 रुपये दंड', कोकणातील काही गावांची चाकरमान्यांसाठी नियमावली