Pravin Darekar On Sanjay Raut : "शिनसेना नेते खासदार संजय राऊत न हे बोलून किती दिवस मौन पाळत आहेत ते पाहूया. कधी-कधी मौन हे प्रकृतीसाठी चांगलं असतं आणि मौनातून मनःशांती मिळते, हे संजय राऊत यांना उशिरा कळालं, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. "कधी कधी शांतता हे उत्तम उत्तर असतं," असं संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटला उत्तर देताना प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना दोन आठवड्यांचा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला दिलासा दोन आठवड्यांसाठी कायम ठेवला आहे. यावरूनही प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, "माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, हे मी आधीपासूनच सांगत होतो. हायकोर्टात गेल्यानंतर न्यायालयाने 15 दिवसाचे रिलीफ दिले आहे. पोलिसांवर दबाव आणून राज्य सरकारने ही केस बनवली आहे. मला न्याय मिळेल असा विश्वास आहे. आपले नेते तुरुंगात आहेत. तर अजून काही जण तुरूंगात जाण्याच्या प्रक्रियेत आहेत. असे असताना अॅक्शनला रिअॅक्शन देण्याचा प्रयत्न होत आहे. किती जरी दबाव आणला तरी आम्ही सरकार विरोधात असाच आवाज उठवत राहू."
प्रविण दरेकर यांनी यावळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. "कोकणची जनता यावेळी कोणाला हद्दपार करणार हे लवकरच कळेल. कोकणात शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकत असून हे सरकार पर्यटनावर भरीव तरतूद करू शकले नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. नाना पटोले हे फक्त प्रसिद्धीसाठी बोलत आहेत. त्यामूळे त्यांना फार गांभीर्याने घेऊ नये, असा टोला दरेकर यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे, काँग्रेचे नाना पटोले आणि भाई जगताप यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी यावेळी सागितले आहे.
महत्वाच्या बातम्या