Devendra Fadnavis On Nana Patole: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केलाय. याबद्दल भाजपनं (BJP) माफी मागावी, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय. यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fandnavis) यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलीय. नाना पटोलेंनी कितीही नोंटकी केली तरी उपयोग नाही. नरेंद्र मोदींना माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट काँग्रेसनंच देशाची माफी मागावी, असं त्यांनी म्हटलंय.
नुकताच फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नाना पटोलेंनी कितीही नोंटकी केली तरी काही उपयोग होणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट काँग्रेसनंच देशाची मागी मागितली पाहिजे", अंस फडणवीसांनी म्हटलंय.
काँग्रेसच्या आंदोलनामुळं मुंबईकरांना अनेक अडचणींना समारे जावा लागलं. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस आपलं आंदोलन तात्पूर्त मागं घेतलंय. मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली. भाजपने गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. आज भाजपचा गुंडगिरीचा चेहरा समोर आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जो पर्यंत नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री माफी मागत नाही, तोपर्यंत काँग्रेसचं आंदोलन सुरुच राहील, असा इशाराही त्यांनी दिलाय. केंद्र सरकार देश विकून कामकाज चालवत आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांच्या पाठिशी उभ्या राहाणाऱ्यांचा काँग्रेस निषेध करतेय. भाजपनं भाडेकरू लोक रस्त्यावर आणली आहेत. भाजपच महाराष्ट्र द्रोही असल्याचं स्पष्ट झालंय. आजचं आंदोलन मागं घेतो, पण खासदारांच्या घराबाहेर आंदोलन सुरु राहणार, असं नाना पटोलेंनी म्हटलंय.
हे देखील वाचा-
- NEET Exam : अवघी ३ फूट उंची, वडिलांचे छत्र हरवलेली अंकिता बनणार सर्वात कमी उंचीची महिला डॉक्टर!
- Congress Protest : मुंबईतील भाजपविरोधातील आंदोलन थांबवले; नाना पटोले यांनी दिले 'हे' कारण
- Maratha Reservation : संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा; मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha