मुंबई : आगामी मुंबई महानगर पालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (bjp) आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पालिकेतील भ्रष्टचाराची तक्रार केली आहे. 


मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, नियमन समितीत करण्यात आलेले बदल आणि बदल करण्यात आलेल्या विद्यापीठ कायद्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, "राणीच्या बागेतील दुर्मिळ प्राण्यांचे वास्तू बनवण्यासाठी देण्यात आलेल्या 106 कोटी कंत्राट प्रकरणात राज्यपालांकडे तक्रार केली आहे. आता लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहे. त्यानंतर याबाबत न्यायालयातही जनहित याचिका दाखल करणार आहे. 


चंद्रकांत पाटील म्हणाले, " नऊ मजली इमारत अधिकृत आणि चार मजले अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला ४ कोटी ३० लाख हा दंड आणि व्याज मंत्रीमंडळ बैठकीत माफ करण्यात आला. ही अत्यंत बेकायदेशीर गोष्ट आहे आणि घटनेच्याविरोधी आहे. राज्यपाल हे मंत्रीपदाची शपथ देत असतात. ही शपथ घेताना कोणत्याही  एका व्यक्तीच्या व्यक्तीगत फायद्यासाठी काम करणार नाही अशी शपथ घेतलेली असते. ही शपथ राज्यपाल देत असतात. त्यामुळे  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनला दंड माफी करून राज्यपालांनी दिलेल्या शपथेचा भंग करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही याबाबत राज्यपालांना भेटून तक्रार केली आहे.  


राणी बागेतील कंत्राट आणि प्रताप सरनाईक यांना करण्यात आलेली दंड माफी या दोन्ही प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे केली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. 


महत्वाच्या बातम्या