BJP Girish Mahajan on Eknath Khadse : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.दुसरीकडे भाजप आमदार गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केले आहेत. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात (Pune Bhosari Land Scam) एकनाथ खडसेंना (Eknath Shinde) कुठलीही क्लिनचिट कोर्टाने दिलेली नाही. झोटिंग समितीचा अहवाल सुद्धा सर्वांसमोर आहे, असं भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यावेळी म्हणाले. तुम्ही म्हणत असाल, झोटिंग समितीचा अहवाल विधानसभेत पटलावर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांना सांगेन, असंही आव्हानही एकनाथ खडसेंना गिरीश महाजन यांनी दिलंय. राज्यात दुसरे संजय राऊत एकनाथ खडसे असल्याची टीकाही महाजन यांनी केली आहे.


भोसरी भूखंड प्रकरणावरुन खडसेंनी नाव घेता गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता. या आरोपांना भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. मंत्री असतांना खडसेंनी गैरकृत्य केलं, चुकीचे कामे केली, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला असून त्यामुळे ते चौकशीच्या फेऱ्यांमध्ये सापडले आहेत.त्यामुळे त्यांचे जावई वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. रजिस्ट्रार सुध्दा जेलमध्ये आहे. आता फक्त कोर्टाची no coercive action असल्यामुळे खडसे जेलमध्ये जात नाही. कोर्टाची ॲक्शन हटल्यावर जावयासोबत एकनाथ खडसे सुध्दा जेलमध्ये जातील, असा इशाराही गिरीश महाजन यांनी यावेळी दिला आहे. तर आम्ही त्यांना जेलमध्ये टाकतोय या खडसेंच्या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. तुम्ही पाक असाल तर चौकशी समितीला सामोर जावून पुरावे दाखवा, पुरावे नसतील तर कारवाई होईल असही महाजन यांनी यावेळी सांगितलं.


महाजन म्हणाले की, एकनाथ खडसेंविरोधात कारवाई कुठल्याप्रकारे सत्तेचा गैरवापर नाही, त्यांच्या विरोधातील तक्रारी या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या आहेत. मात्र गेल्या काळात त्‍यांचं सरकार असल्याने या तक्रारी दाबल्या गेल्या होत्या. आता चौकशीत त्यात स्पष्टता येईल आणि कोण स्वच्छ आहे, कोणाचे हात बरबटले आहेत, ते सुध्दा समोर येईल, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.


मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मुंबईला परतले आहेत. लवकर मंत्रिमंडळ विस्तार होईल, आता वाट पाहावी लागणार नाही, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे संकेतही गिरीश महाजन यांनी दिले आहेत.


पुरावे नसतील तर संजय राऊतांना घाबरण्याची गरज नाही 


संजय राऊत यांच्यावर जी कारवाई झाली आहे, ती नियमानुसार झाली असल्याच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटलंय. चौकशीनंतर जे काय आहे ते स्पष्ट होईल असे सांगत असतांना गिरीश महाजन यांनी घरी शिवसैनिक जमा करण्याची , गोंधळ घालण्याची गरज नाहीये, असा टोलाही महाजन यांनी लगावला आहे. संजय राऊत ईडीलाही सांगताहेत की, तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा, माझ्यावर कारवाई करुन दाखवा, असं संजय राऊत सांगताहेत. संजय राऊत अपवाद आहेत, त्यामुळे ते वाट्टेल ते बोलू शकतात, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या


Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून 'या' प्रकरणात गुन्हा दाखल होणार?


ED Raids On Sanjay Raut: संजय राऊत यांच्यावर ईडीकडून अटकेची टांगती तलवार


Sanjay Raut : संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मुख्यमंत्री एकाच वाक्यात म्हणाले, मोठी कारवाई करायचीय पण... 


Sanjay Raut ED : ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र; काँग्रेसचा गंभीर आरोप, काँग्रेस राऊतांच्या पाठिशी