मुंबई: कुणी काहीही मागितलं नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) दिली आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे (Shiv Sena) गटाने 22 जागांवर दावा केला आहे. त्यावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार राहुल शेवाळ यांनी लोकसभेच्या 48 पैकी 22 जागा आपल्याला मिळाव्यात असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. अजून जागावाटपाची चर्चा झाली नाही, तीनही पक्ष एकत्रित बसू आणि निर्णय घेऊ असं बावनकुळे म्हणाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, यावर आम्ही तीनही पक्ष एकत्रित बसू आण जागावाटपाचा निर्णय घेऊ. अद्याप कुणीही काहीही मागितलं नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ.
शिवसेनेच्या दाव्यानंतर जागावाटपाचा पेच?
शिवसेना शिंदे गटाने 48 पैकी 22 जागांवर दावा केला आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी 13 खासदार आहेत त्या 13 जागा भाजप सोडण्यास तयार असल्याचं सांगितलं जातंय. पण सत्तेत अजित पवार सामील झाल्यानंतर त्यांनाही लोकसभेच्या काही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे 48 जागांचे वाटप कसं करायचं हा प्रश्न आहे. भाजपने राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं आहे.
ललित पाटीलवर काय म्हणाले फडणवीस?
ललित पाटीलच्या अटकेमुळे ड्रग्जबाबतचं मोठं रॅकेट उघड होणार असल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्याचसोबत, ललित पाटीलच्या अटकेनंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत, मात्र त्या आताच जाहीर करणार नसल्याचं फडणवीस म्हणालेत. तसेच, आता अनेक गोष्टी बाहेर येणार असून, त्यामुळे अनेकांची तोंडं बंद होणारेत, असही फडणवीस म्हणालेत. दरम्यान, महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणं हे सरकारचे ध्येय असून, त्यासाठी जोरदार उपाययोजना केल्या जात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
कल्याण आणि ठाण्याची जागा कुणी मागितली नाही
कल्याण आणि ठाण्याची जागा अद्याप कुणीही मागितली नाही, जागावाटपाच्या चर्चेवेळी सत्तेतले तीनही पक्ष एकत्र येऊन त्याची चर्चा करतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मात्र शिंदे गटाची धाकधुक वाढल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा: