सोलापूर : दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून (BJP)  ऑफर होती, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी केला. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी इथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदेंनी हे वक्तव्य केलंय मात्र सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule)  केले आहे.


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,  मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की,  भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेला ऑफर दिली नाही.  भेटी होणे ही वेगळी गोष्ट आहे मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही. आमच्य पक्षाला तशी गरज नाही, पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहे. आम्ही कुणालाही आमदारकी, खासदारकीसाठी पक्षात या असं म्हणणार नाही. परंतु  मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करणार.


पुढील  काळात उद्धव ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे


चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय राऊत, उद्धव ठाकरे अनेक सभांमध्ये बोलले होते  मोदीजीअखंड भारत करू शकतात. ज्या काँग्रेस पार्टीने रामाला, रामसेतूनला काल्पनिक म्हटलं आहे अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे आहेत.  पुढील  काळात उद्धव ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाही. 


चर्चेतून जागावाटप निश्चित होईल : चंद्रशेखर बावनकुळे


जागावाटपाविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दिल्लतून सोलापूरच्या खासदारकीचा उमेदवार ठरवण्यात येईल. राज्य ठरवत नाही अजित पवार, देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे एकत्र बसून कोणला कोणती जागा  द्यायची हे ठरवतील आणि मग केंद्रीय बोर्ड ठरवेल.


काय म्हणाले सुशीमकुमार शिंदे?


माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असे स्पष्टीकरण देखील यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. तसेच, आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार. तसेच प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. मात्र, परभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, 'लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही'. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील. 


हे ही वाचा :