Biparjoy Cyclone: बिपरजॉय वादळामुळे (Biparjoy Cyclone) सौराष्ट्र आणि कच्छमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळाच्या ताज्या अपडेटबद्दल बोलायचे झालं तर गेल्या सहा तासांत त्याचा वेग कमी झाला आहे. हे वादळ सध्या ईशान्य अरबी समुद्रातील जाखाऊ बंदरापासून 280 किमी अंतरावर आहे. वादळामुळे ताशी 150 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि अशा परिस्थितीत लोकांना घरातच राहण्याचा आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. वास्तविक जेव्हा वारे 150 किमी वेगाने वाहतात तेव्हा परिस्थिती खूप धोकादायक असू शकते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.


जर इतक्या जोराचा वारा असेल तर नेमकं काय नुकसान होऊ शकतं? आणि त्यावेळी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया, या अफाट वाऱ्यामुळे काय परिस्थिती असेल? आणि इतक्या जोराचे वारे जेव्हा वाहू लागतात, तेव्हा किती किलोच्या वस्तू एका ठिकाणाहून उडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि हे वादळ कोणत्या गोष्टी एका जागेवरुन हलवू शकते? पाहूया.


जोरदार वाऱ्यामुळे नेमकं काय होतं?


अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसच्या वेबसाइटवर वाऱ्याच्या वेगाच्या आधारे होणाऱ्या नुकसानीची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा वारा 96 ते 110 मैल प्रति तास म्हणजेच, सुमारे 150 किलोमीटर वेगाने वाहतो तेव्हा त्यामुळे खूप नुकसान होते. हा वारा पक्क्या घराच्या छताला देखील हानी पोहोचवू शकतो, त्यामुळे घरांची पडझड होते. वाऱ्याच्या वेगामुळे मोठमोठी झाडंही उन्मळून पडून मोठं नुकसान होतं, यासोबतच खांब पडण्याच्या घटनाही समोर येऊ शकतात.


सोसाट्याचा वाऱ्यात गाड्या उडून जाऊ शकतात का?


जेव्हा वारा ताशी 3 मैल वेगाने वाहतो तेव्हा पानं सहजपणे उडू शकतात. परंतु, जर कारबद्दल बोलायचं झालं, तर ताशी 90 मैल वेगाने म्हणजे सुमारे 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा जेव्हा वाहतो त्यावेळी गाड्या देखील उडून जाऊ शकतात.  यापेक्षा कमी हवेच्या तीव्रतेत माणूस देखील फिरू शकतो. किलोच्या हिशोबाने बोलायचं झालं, तर शिकागोच्या एका वेबसाइटवर असं सांगण्यात आलंय की, 45 किमी प्रति तास वाऱ्याचा वेग 16 किलोपर्यंत वजनाच्या वस्तू उचलून फेकू शकतो. तर मग दीडशे किमीच्या हवेत बऱ्याच अवजड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडून जाऊ शकतात.


नेमक्या कोणत्या वस्तू जाऊ शकतात उडून?


या हवेत कोणत्या वस्तू उडून जाऊ शकतात हे स्पष्टपणे सांगणं कठीण आहे. वार्‍यामुळे उडून जाणाऱ्या वस्तू वाऱ्याच्या जोरावर आणि वस्तूच्या वजनावर अवलंबून असतात. जसे- खुर्ची वाऱ्याच्या कमी वेगाने उडून जाते, पण दगडासारखी वजनाची दुसरी कोणतीही गोष्ट उडत नाही.


हेही वाचा:


Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट, वेग मंदावला मात्र धोका कायम