Cyclone Biparjoy Landfall : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाने नवीन अपडेट दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या (Gujrat) किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग मंदावला आहे. मागील तीन दिवसांपासून चक्रीवादळाची अधिक हालचाल झालेली नाही. गुजरातसह महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. येथील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे.


बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट


चक्रीवादळ बिपरजॉय भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे पुढे सरकत आहे. येत्या 24 तासांत हे चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या कराची दरम्यान आदळण्याची शक्यता आहे. गुजरातच्या कच्छ आणि मांडवी भागात याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, चक्रीवादळाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 






बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग मंदावला 


भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं आहे की, बिपरजॉय वादळाचा वेग गेल्या सहा तासांत मंदावला आहे. आयएमडीच्या महासंचालकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बिपरजॉय वादळ सध्या ईशान्य अरबी समुद्रातील जाखाऊ बंदरापासून 280 किमी दूर आहे. गेल्या २४ तासांत वादळाचा वेग मंदावला असून तो जवळपास स्थिर आहे. गेल्या तीनपासून त्यात फारशी हालचाल नाही.


बिपरजॉय चक्रीवादळाचं अतितीव्र श्रेणीत रुपांतर


बिपरजॉय चक्रीवादळाचं (Cyclone Biporjoy) संकट वाढतंच चाललं आहे. आता चक्रीवादळानं अधिक रौद्र रुप धारण केलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचं अत्यंत तीव्र वादळातून पुन्हा अतितीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत रुपांतर झालं आहे. भारताच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका आहे. पुढील 48 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्टजवळून ओलांडण्याची शक्यता आहे.


कच्छ आणि सौराष्ट्रासह 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईला असलेला संभाव्य धोका टळला आहे. हे चक्रीवादळ मुंबईला समांतर राहात गुजरातच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. त्यामुळं गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्रासह 8 जिल्ह्यांना चक्रीवादळामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराचीदरम्यान जमिनीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Cyclone Biparjoy : 'बिपरजॉय'चं संकट! कुठे आणि केव्हा धडकणार, चक्रीवादळामुळे किती नुकसान होऊ शकतं? जाणून घ्या सविस्तर...