PHOTO : मुंबईत समुद्राला उधाण, किनारपट्टीवर उंच उंच लाटा
बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातच्या दिशेने उत्तर पश्चिम मार्गाने पुढे सरकले असले तरी मुंबईतील किनारपट्टीवर याचा परिणाम पाहायला मिळत आहे.
Marin Drive High Tide Waves
1/9
बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातच्या दिशेने उत्तर पश्चिम मार्गाने पुढे सरकले असले तरी मुंबईतील किनारपट्टीवर याचा परिणाम पाहायला मिळत आहे
2/9
सकाळपासूनच मुंबई किनारपट्टी लगत समुद्र खवळलेला पाहायला मिळत आहे.
3/9
त्यामुळे भरतीच्या वेळी साधारणपणे चार मीटरच्या उंच उंच लाटा मुंबईच्या समुद्र किनारपट्ट्यांलगत उसळताना पाहायला मिळत आहेत.
4/9
आज दिवसभर मुंबई समुद्रकिनारपट्टी लगत ताशी 45 ते 55 किलोमीटर एवढा वाऱ्यांचा वेग असेल.
5/9
सोबतच मुंबई आणि परिसरामध्ये काही ठिकाणी मान्सूनपूर्व हलक्या तर मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
6/9
मुंबई शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट वातावारण राहण्याची शक्यता आहे.
7/9
मुंबईत आज रात्री नऊ वाजून १० मिनिटांनी भरती येणार असून 3.69 मीटर उंचीच्या लाटा उसळतील.
8/9
बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने उत्तर-पश्चिम पुढे सरकत असून कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा रेड अलर्ट जारी केला आहे
9/9
बिपारजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या संध्याकाळी ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती आहे.
Published at : 14 Jun 2023 11:52 AM (IST)