औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर गावच्या वरद गणेश शाळेत बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी घेतली जाते आहे. याचा फायदा एवढा झालाय की शाळेतील उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शाळेत मुलगा हजर आहे की गैरहजर हे पाल्याला एसएमएसद्वारे कळवले जाते. या बायोमेट्रिक हजेरीमुळे शिक्षकांचा हजेरीसाठीचा वेळ वाचला असून, दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांवर वचक घालता आला आहे.


केवळ हेजीरीच नाही तर विद्यार्थीना शाळा सोडताना विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक मशिनवर अंगठा टेकवावा लागतो. या बायोमेट्रिक हजेरीचे अनेक फायदे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना झाले आहेत. महिन्याकाठी विद्यार्थ्यांच्या हजेरी-गैरहजेरी काही वेळात शिक्षकांना काढता येते. ग्रामीण भागातील ही शाळा आहे. या शाळेत लासूर गावच्या काही खेड्यातून मुल पहीली ते दहावी पर्यंतच शिक्षण घेण्यासाठी येतात. काही विद्यार्थी शाऴेच्या नावाखाली घरातून निघत मात्र ती शाळेत पोहचत नव्हती. आता मुलाची गैरहजेरीचा एसएमएस पालकांना पोचत असल्यानं दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा बसला असून, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढली आहे.

या शाळेला आयएसओ नामाकंन आहे. विद्यार्थ्यां या हजेरीच कुतूहल आहे आणि लेटमार्क लागू नये साठीही विद्यार्थी वेळेत हजेरी लावण्यासाठी वेळेत पोहोचतात.

अंगठे बहाद्दरांची सख्या कमी करण्यासाठी शाळेच्या पटावरील संख्या वाढवण्यासाठी आपण धडपड केली. आता वर्गात प्रवेशापूर्वी आंगठा लावला जातो आहे. अंगठ्याचाही सदुपयोग केल्यास त्यांचा कसा फायदा होतो त्यांच हे उत्तम उदाहरण होय.