नागपूरः पावसाने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विदर्भात पूर्वेकडून पुनरागमन करण्यास सुरुवात केली आहे. गडचिरोलीमध्ये मुसळधार बरसल्यानंतर गोंदियातही धुवाधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. नागपूरकरांनाही पावसाचा फटका बसला आहे.


 

विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात दिवसभर रिमझिम पाऊस झाला. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पावसाने पश्चिम विदर्भाकडे कूच केल्याचे संकेत आहेत यवतमाळमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर रिमझिम पावासाने हजेरी लावली. वाशिमसह अन्य जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

 

पावसाने जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त दिवस ओढ दिली आहे. पिकांना वाचवण्यासाठी सध्या पावसाची तीव्र गरज असल्याने शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.