Dhule: धुळे शहरातील असलेल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सह उत्तर महाराष्ट्रातील इतर रुग्णालयांवर कोट्यवधी रुपये विजबिल थकबाकी आहे,अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत महावितरण कंपनीने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरली नाही. यामुळे आता नाईलाजास्तव या रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


कोविडच्या संकटातही महावितरण कंपनीने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला होता. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचा देखील समावेश आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये अखंडित वीज पुरवठा देण्यात आला होता. मात्र थकबाकी भरण्यासाठी महावितरण कडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता तरी देखील रुग्णालयांनी अद्यापपर्यंत थकबाकी भरली नाही. त्यामुळे सदर रुग्णालयांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात येत आहे. 


कोरोनामुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून थकबाकी वसूल शिवाय दुसरा पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालयांनी त्वरित थकबाकी भरावी अन्यथा नियमाप्रमाणे वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे.



अशी आहे थकबाकी


भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे: 53 लाख 29 हजार 989 रुपये.


शिरपूर उपजिल्हा रुग्णालय: 15 लाख 49 हजार 795 रुपये.


जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव: 10 लाख 69 हजार 113 रुपये...


डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव: 5 कोटी 22 लाख 79 हजार 634 रुपये...


जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार: 51 लाख तीन हजार 142 रुपये


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha