Success  Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदाच्या परिक्षेत भावना यादव देशात मुलींमध्ये प्रथम आली आहे. तिच्या या कामगिरीने महाराष्ट्राची शान वाढवली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून मुलीमध्ये उत्तीर्ण झालेली ती एकमेव महिला अधिकारी आहे. मूळची सांगली जिल्ह्यातील विटा जवळील नागेवाडी या गावची भावना आहे. तिच्या या यशाचे गावकऱ्यांकडून देखील कौतुक होत आहे. या परिक्षेसाठी नियोजन खूप गरजेचे असते, ते नियोजन मी केले होते. तसेच फिजीकल फिटनेसवर देखील ध्यान द्यावे लागते असे मत भावना यादव हिने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले. या यशाचा मला खूप आनंद झाला आहे. मुलींनी आव्हाने स्विकारून  या फिल्डमध्ये यावे असे आवाहन देखील यावेळी भावना यादवने केले. 


भावनाने एम एस्सी केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. राज्य लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा भावना दोन वेळा उत्तीर्ण झाली. तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा ती एक वेळा उत्तीर्ण झाली. परंतू शारीरिक चाचणीत तिला अपयश येत होते. तिने जिद्द आणि चिकाटी न सोडता फिजिकल फिटनेसवर जोर दिला. भावना आता लवकरच हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे.


या यशाचा मिळाल्यामुळे मला छान वाटत आहे. मला वाटत नव्हते की मी मुलींमध्ये देशात पहिली येईल असे यावेळी भावना यादव हिने सांगितले. मी यासाठी योग्य ते नियोजन केले होते. तसेच मुलांसोबत रनिंगचा सराव केला होता. पण आधापासूनच माईंडसेट केला होता असेही तिने यावेळी सांगितले. माझे वडील मुंबई पोलीसमध्ये असल्यामुळे मला पहिल्यापासूनच युनिफॉम सर्व्हिसची क्रेझ होती. माझ्या वडिलाकडून मला प्रेरणा मिळाली असल्याचेही यावेळी तिने सांगितले.


माझे सगळे शिक्षण मुंबईत झाले. मात्र, आम्ही गावासोबत कायम कनेक्ट होतो. यात्रेवेळी आम्ही गावी येत होते असेही तिने सांगितले. मला हे यश मिळाल्यापासून खूप मुलींचे फोन येत आहेत. आम्हालाही या क्षेत्रात करियर करायचे आहे म्हणून. मुलींनी आणि मुलांनीसुद्धा या क्षेत्रात यायला हवे. आपली जर कष्ट करण्याची तयारी असेल तर यश मिळते असेही यावेळी तिने सांगितले. मला गे यश मिळाल्यापासून माझे आयुष्य 360 डिग्रीमध्ये बदलले असल्याचे यावेळी भावना यादवने सांगितले.



महत्त्वाच्या बातम्या: