Satosh Parab Attack Case: भाजप आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं नाकारला आहे. नितेश राणेंसोबत अटकपूर्व जामीन अर्ज करणाऱ्या संदेश उर्फ गोट्या सावंत यांचीही याचिका फेटाळलीय. तर, मनिष दळवींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान जाण्यासाठी दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची नितेश राणेंच्या वकिलांनी मागणी केलीय. आज दुपारी 12.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना तात्पुरता दिलासा मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबर रोजी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवली येथे जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी नितेश राणे यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु, जिल्हा न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर हायकोर्टानंही आज त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. नितेश राणेंसोबत अटकपूर्व जामीन अर्ज करणा-या संदेश उर्फ गोट्या सावंत यांचीही याचिका फेटाळलीय. तर मनीष दळवींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान जाण्यासाठी दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची नितेश राणेंच्या वकिलांनी मागणी केलीय. आज दुपारी 12.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. याप्रकरणी नितेश राणेंना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
- इतर महत्वाच्या बातम्या-
- केंद्राकडून शरद पवारांना पद्म पुरस्कार, मात्र देवेंद्र फडणवीसांना त्याचा विसर; सुप्रिया सुळे यांची टीका
- OBC Political Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं काय होणार? आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
- Shakambhari Purnima : आज शाकंभरी पौर्णिमा, मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा, कोरोनामुळं भाविकांना बंदी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha