Bhausaheb shinde: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb shinde) यांनी केलाय. इतकच नाही तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे (pakistan) नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदेंनी केला आहे. दीपाली यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. 


उपमुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी


अहमदनगर (Ahmednagar) येथे आज भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra  Fadnavis) यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही असं भाऊसाहेब शिंदे यांचं म्हणणं आहे. दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई झाली नाही तर आगामी काळात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.


याआधी देखील  भाऊसाहेब शिंदे यांनी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याबाबत अनेक दावे केले होते. दिपाली सय्यद यांनी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप त्यांचेच माजी स्वीय साहय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखवला आणि कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता. दीपाली सय्यद यांचं पाकिस्तान-दुबई कनेक्शन आहे, असंही भाऊसाहेब शिंदे हे म्हणाले होते. भाऊसाहेब शिंदे यांच्या आरोपावर दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या,  'माझ्यावर आणि माझ्या ट्रस्टवर जे आरोप झाले ते अत्यंत चुकीचे आहेत. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना मी माझ्या नावावर लोकांकडून पैसे घेताना पकडलंय.'


दीपाली सय्यद यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. तसेच त्या राजकारणात देखील सक्रिय असतात. काळशेकर आहे का?,घुंगराच्या नादात, जाऊ तिथे खाऊ,मुंबईचा डबेवाला, होऊन जाऊ दे यांसारख्या चित्रपटांमध्ये दीपाली यांनी काम केलं आहे. दीपाली या त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Dipali Sayyed : मुलींच्या लग्नात खर्च करण्याऐवजी शिक्षणावर करा, महिला सक्षम होतील : दीपाली सय्यद