Sanjay Shirsat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) हे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपात जातील असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे. तर 15 दिवसांच्या आत ठाकरे गटांतील अनेक आमदार शिवसेनेत येतील असा दावा देखील शिरसाटांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. 


अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये जाण्याची मानसिकता 


राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तशा हालचाली सुरु आहेत असंही संजय शिरसाट म्हणाले. एवढ्या मोठ्या नेत्याला काँग्रेसमध्ये वागणूक योग्य मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळं अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील असे शिरसाट म्हणाले. कारण अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्या घडामोडी पाहता ते भाजपमध्ये जातील असे शिरसाट म्हणाले. अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये जाण्याची मानसिकता झाल्याचे शिरसाट म्हणाले.


राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात विळ्या भोपळ्याचं नात


दरम्यान, बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारणा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात विळ्या भोपळ्याचं नात आहे. राधाकृष्ण विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील असं होईल.काल महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. यावरुनही राजकीय चर्चा सुरू आहेत. यावरुनही आमदार शिरसाट यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. काल झालेली सभा वज्रमुठ सभा नव्हती. नाना पटोले काल आजारी होते म्हणून आले नाहीत सांगत आहेत मग आज ते कोर्टात चालले आहे, यावरुनच महाविकास आघाडीत काय सुरू आहे ते दिसत आहे, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.


गेल्या काही दिवसापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, अशोक चव्हाण यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलं नाही. काल छत्रपती सभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला देकील अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. मात्र, अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वीचं अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं वक्तव्य त्यांनी केल्यानं, पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Abdul Sattar : माझ्या जडणघडणीत अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा वाटा : अब्दुल सत्तार