Maharashtra School: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमी राज्य सरकारनं राज्यातील सर्व शाळा येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होताना दिसतोय. शिक्षण तज्ज्ञांसह विद्यार्थी आणि पालकदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणच्या शाळा सुरू मागणी करू लागलीय. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाला प्रयोगशील ॲक्टिव टीचर्स फोरमनंही राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवलाय.नंदुरबार, गडचिरोली भागात जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता तर सरकारनं पुणे, मुंबईच्या शाळा बंद केल्या असत्या का? असाही सवाल प्रयोगशील ॲक्टिव टीचर्स फोरमचे राज्य संयोजक व शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी उपस्थित केलाय. 


राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात येत आहेत. मात्र, आजही ग्रामीण भागातील शाळा अद्याप सुरू आहेत. राज्य सरकारनं घेतलेल्या सरसकट बंदचा निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरू लागलाय. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील विरगाव येथे कोरोना निर्बंधांचं पालन जिल्हा परिषद शाळा सुरु आहे. यामुळं पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या सर्वानुमते शाळा सुरू ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शाळा बंद करू नये, अशी मागणी केली जातेय. ग्रामीण भागत नेटवर्कची अडचण असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होऊ लागलाय. ऑनलाईन शिक्षणामुळं गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. कारण अनेक विषय ऑनलाईन पद्धतीनं समजून घेता येत नाहीत. यामुळं शाळा ऑनलाईन न ठेवता ऑफलाईन पद्धतीनं सुरू ठेवणअयाची मागणी विद्यार्थी करीत आहेत. 


एकीकडं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं शैक्षणिक वर्ष पुढील शिक्षणासाठी महत्वाचं असताना ऑनलाईन शिक्षण नको, असं मत पालकांचं आहे. या निर्णयावर फेरविचार करण्याची त्यांनी मागणी केलीय. मुलांना ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येत असून शाळेत त्यांच्या कडून व्यवस्थित अभ्यास घेतला जात असल्याने स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळेचा निर्णय घेण्याची मागणी पालकांनी केलीय.


विद्यार्थी व पालक ऑफलाईन शिक्षणासाठी आग्रही असून अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा सरसकट शाळा बंदचा निर्णय चुकीचा असल्याच स्पष्ट केलं आहे. यापुढील काळात कोरोना बरोबर सगळ्यांना जगावे लागणार आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा बंदचा निर्णय घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया ऍक्टिव्ह टीचर्स फोरमचे राज्य संयोजक व शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी दिली. गेल्या दोन वर्षात मुलांच्या शाळा बंद असल्याने त्यांचं समाजिकीकरण झालेलं नाही. ज्या ज्या प्रगत देशात कोरोना वाढला त्यांनी सुद्धा शाळा बंद केल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षणामुळं अनेक नवीन समस्या देखील समोर आल्या. वर्गात समोर बसवून जे शिक्षण दिले जात, त्याला दुसरा पर्याय असूच शकत नाही. अस परखड मत चासकर यांनी यावेळी व्यक्त केलंय.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha