मुंबई :  कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी बारवी सोडून सरसकट शाळा 15 फेब्रुवारी पर्यत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, आता कुठे दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत शैक्षणिक वातावरण निर्मिती होत होती.त्यात सरसकट शाळा बंद करणे हा निर्णय योग्य नसून अशैक्षणिक असल्याचं शिक्षण तज्ज्ञचा म्हणणं आहे. त्यामुळे राज्यात पूर्ण शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे. त्यामुळे राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय हा घाईगडबडीत घेतला गेला का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. 


तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसता सुरवातीला मुंबई, ठाणे मग पुणे त्यानंतर नाशिक, औरंगाबाद असे करत शहरी भागात दहावीवी आणि बारावी सोडून इतर वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले. शिवाय, कोरोना स्थिती पाहून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावे, अशा सूचना देत इतर ठिकाणी शाळा बंद होणार नाहीत, असाही निर्णय झाला.  मात्र , आठ जानेवारीला शनिवारी रात्री ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या त्यात दहावी बारावीचे वर्ग सोडून इतर राज्यभरातील सर्व शाळा या 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील असा मोठा निर्णय घेण्यात आला. आता यालाच मोठा विरोध राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक व पालकांकडून होतोय


शाळा बंद करण्याचा परिणाम नेमका कसा होणार? 



  • विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याची शक्यता आहे.

  • लेखन, वाचन ,ग्रहण क्षमता शाळा बंद असल्यामुळे कमी होत आहे.

  • ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पुरेसे मिळत नसल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दरी निर्माण होत आहे

  • ऑनलाईन शिक्षण पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होतंय

  • शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करताना परिणाम जाणवणार


मागील दोन वर्षात शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे पूर्ण प्रयत्न झाले पण त्यात शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. असे असताना त्यामुळे जिथे कोरोना रुग्णसंख्या नाहीत तिथे शाळा बंद करण्यामागचं राज्य सरकारचं धोरण कळलच नाही. ग्रामीण भागात जरी या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असला तरी मुंबई, पुणे सारख्या शहरात या निर्णयाकडे पाहतांना ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यासाठी पुन्हा एकदा पूर्ण प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी नियोजन देखील केले जात आहे. 



संबंधित बातम्या :


School : नागपूर आणि सिंधुदुर्गातील शाळाही बंद; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाचा निर्णय



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI