Bharat Bandh 2022 : आज सोमवारी आणि उद्या मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. घोषणेप्रमाणे हा संप सुरु देखील झाला आहे.  यात प्रामुख्यानं विद्युत, बँकिंगसह अनेक केंद्रीय कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर होत आहे. यामध्ये कोळसा पुरवणारे कामगार संपावर असल्यानं राज्यात अनेक ठिकाणी अंधार होण्याची शक्यता आहे. 


आज अनेक युनियन संपावर आहेत आणि त्यातच राज्यातील अनेक विद्युत केंद्रांना कोळसा पुरवठा करणाऱ्या वेस्टन कोलफिल्ड्सचे युनियनही सामील आहे. यात खदानीमध्ये काम करणाऱ्यांपासून इतर अनेक हे दोन दिवस संपावर असणार आहेत आणि त्यामुळेच राज्यात अनेक ऊर्जा निर्मिती केंद्रांवर जिथे दोन अडीच दिवसांचाच कोळशाचा साठा आहे. तिथे वीज निर्मितीची परिस्थिती ही अटीतटीची  होऊ शकते. 
  
विद्युत केंद्र          स्टॉकचे दिवस 
खापरखेडा           10 
चंद्रपूर                8 
पारस                2.5 
परळी               2.7 
भुसावळ            2 
नाशिक             2 
कोराडी            2


नुसतं राज्यस्तरावर बघितलं तर एकंदरीत गरजेच्या तुलनेत राज्यात कोळशाचा मुबलक साठा आहे. मात्र त्याचं समान वितरण प्रत्येक केंद्रावर नसल्यामुळे राज्यात साठा असूनही पारस, परळी, भुसावळ, नाशिक, कोराडी सारखे ऊर्जा निर्मिती केंद्र यात वीज निर्मितीची स्थिती हातातोंडाशी येऊ शकते. त्याचे एक कारण हेही आहे कि संपकरी हे वापस कामाला गेल्यावर परत एकदा कोळसा सप्लायची गाडी सुरळीत व्हायला आणि कोळसा केंद्रांवर पोचायला पुढचे दोन दिवस लागतील. 


ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांचे मात्र म्हणणं आहे ही दोन दिवसाच्या संपाचा फारसा परिणाम होणार नाही. त्यांचं हेही म्हणणं आहे की एकीकडे जसा आत्ता कोळसा बंद आहे, तसाच काही कोळसा हा प्रवासातही आहे आणि त्यामुळेच प्रवासात असणाऱ्या कोळशावर संपकऱ्यांचा कंट्रोल नाही. तो कोळसा हा व्यवस्थितरित्या ऊर्जानिर्मिती केंद्रांकडे पोहोचेल, मात्र एक गोष्ट नक्की आहे की कुठेतरी अगदी 'कट टू कट'ची परिस्थिती मात्र विद्युत खात्यावर या संपामुळे आली आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 


 






 



इतर संबंधित बातम्या


Bharat Band Breaking News LIVE Updates : आज भारत बंदची हाक, राज्यासह देशभरातील अपडेट एका क्लिकवर...


Bharat Bandh : आज आणि उद्या भारत बंदची हाक, संपाचा तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या 8 ठळक मुद्दे