Bhandara Latest News : भंडारा जिल्ह्यात गाठी व्यवसायात चक्क आता महिला बचत गटांची एंट्री झाली आहे. पारंपरिक गाठी व्यावसायिकांप्रमाणे आता बचत गटांमार्फत ही ह्या व्यवसायात लाखोची उलाढाल होत आहे. त्यामुळे स्थानिक कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.


हिंदू संस्कृतीत होलीका पुजेचा विशेष महत्व आहे. होळीला गाठीचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे होळी सणाच्या पाश्वभूमीवर पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आजही पिढीजात बांधव साखरेच्या पाकापासून बनविण्यात येणाऱ्या या "गाठीला " अनन्य साधारण महत्व आहे. मात्र ह्या व्यवसायात जिल्ह्यातील महिला बचत गट ही उतरले आहेत. रंगाचा सण म्हणून  होळी हा उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, हाच उत्सव कित्येकांना महिना भर हाताला रोजगार सुद्धा देत असतो. त्यात गुलाल बनविणाऱ्यापासून तर पिचकाऱ्या बनविणाऱ्या असंख्य कामगारांचा समावेश असतो. मात्र होळी दहनाचा दिवशी पुरण पोळी सोबतच होळीला गाठ्यांचा नैवेद्य देण्याची प्रथा असून आजही भंडारा शहरात  " गाठ्या " बनविणारे पिढीजात परिवार आजच्या घडीला सुद्धा गाठ्यांची निर्मिती पारंपरिक पद्धतीने करीत आहेत. या पिढीजात व्यवसायात आता लक्ष्मी महिला बचत गटांमाध्यमातून रोजगाराची निर्मिंती होऊन गाठ्यांचा विक्रीतून दरवर्षी लाखोची उलाढाल एकट्या भंडारा जिल्ह्यातून होत आहे. तर या गाठ्यांच्या माळा तयार करण्या करिता मोठ्या प्रमाणात साखरेला वितळवून त्याचा "पाक " तयार करण्यात येत असतो व हाच गरम, गरम पाक लाकडाचा बनविलेल्या साच्यात हळुवारपणे टाकुन त्याला थंड होऊ दिल्यानंतर अशा प्रकारे गाठ्यांच्या माळा अगदी 10 मिनिटात तयार होत असते. त्यामध्ये 50 ग्रामपासून तर एक किलो किलोपर्यंच्या गाठ्यांह्या ठिकाणी तयार केल्या जातात. मागील 2 वर्षा पासून कोरोनाने उतरली कळा आलेल्यां या व्यवसायाने थोड़ी भरारी घेतली आहे.
 
भंडारा जिल्ह्यात पिढीजात विणकरांप्रमाणेच गाठ्या बनविणारे कामगार देखील मोठ्या प्रमाणात होते, मात्र बदलत्या काळाप्रमाणे आज त्यांची संख्या कमी होत गेली. आजच्या घडीला गाठ्यांचा व्यवसाय हा भंडारा, तुमसर व पवनी  या तीन तालुक्यापर्यंतच मर्यादीत होता. मात्र ह्यात जिल्हा परिषदेच्या मार्फत महिला बचत गटाना प्रशिक्षण दिल्याने त्यात महिला बचत गट उतरले. त्यामुळे संपृष्ठात येत असलेल्या ह्या व्यवसायाला नव संजीवनी मिलळी आहे.