Beed: बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा प्रशासनावर अंकुश राहिला नसल्याने जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. तसेच यामुळे जिल्ह्याचे नाव बदनामी होत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून यावर आवाज उठवल्यावर पालकमंत्र्यांना मिरच्या लागतात. मात्र त्यांच्याच पक्षाचे आमदार हे लक्षवेधीमध्ये हे सगळे प्रश्न मांडतात. त्यामुळे पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे देखील राजेंद्र मस्के म्हणाले आहेत

राष्टवादी जिल्हाध्यक्षांनी मस्के यांना प्रत्युत्तर


राजेंद्र मस्के यांना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण म्हणाले आहेत की, ''स्वतःच्या घराच्या जागेत पत्त्यांचा क्लब सापडल्याने जेलमध्ये जायची पाळी आली, देवस्थानच्या जमिनी बळकावल्याच्या तक्रारींचे व आरोपांचे वलय देखील भाजप जिल्हाध्यक्ष व आणखी काही आजी माजी भाजप नेत्यांच्या अवतीभोवती फिरत आहे. परीक्षाद्वारे नोकरभरतीमध्ये उघड झालेल्या घोटाळ्यात तर चक्क भाजपचे पदाधिकारी अटकेत आहेत.'' भाजप नेत्यांना टोला लागलेत ते म्हणाले आहेत की, ''जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकांमध्ये हाणामाऱ्या करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचे व्हिडीओ देखील अजून ताजेच आहेत. या परिस्थितीत कायदा व सुवतावस्थेबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नेत्यांनी वल्गना करणे निव्वळ हास्यास्पद आहे.''


दरम्यान, बीडमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगत बीड बिहार झालाय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. यावर धनंजय मुंडे म्हणाले होते की, ''दोन राजकीय पक्षांमध्ये दोन विचारधारा असू शकतात. विचारधारेची लढाई विचारधारेने होऊ द्या. तुमच्या राजकीय वैऱ्याला बदनाम करायचेय, तर जिल्ह्याचे नाव घेऊन बदनामी करू नका. हवे तर माझ्यावर वार करा, पण मायभूमीला बदनाम करु नका.'' बीड शहरातील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडेबीड शहरातील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे असे म्हणाले होते.


संबंधित बातमी: 


Dhananjay Munde : पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या बदनामीचं राजकारण थांबवावं : धनंजय मुंडे