भंडारा : भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा पराभव केला. इथं राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा दारुण पराभव केला. पहिल्या फेरीपासून कुकडे हे आघाडीवर होते. कुकडेंनी 40 हजारांहून अधिक मतांनी पटलेंचा पराभव केला.


मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये अटीतटीची लढत होती. सुरुवातीपासून राष्ट्रवादीने काही हजार मतांची आघाडी घेतली होती, मात्र सहाव्या फेरीनंतर भाजपला आघाडी मिळाली.

अखेर, राष्ट्रवादीला मोठ्या मताधिक्याने विजयी कूच करण्यास यश आलं. भाजप उमेदवाराला मतांतील तफावत मिटवता न आल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत हेमंत पटले यांचा दारुण पराभव झाला.

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं.

LIVE UPDATE


सोळावी फेरी

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 2,70,471
    
हेमंत पटले - (भाजप) - 2,43,204


मताधिक्य - 27,267

चौदावी फेरी

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 2,26,977
    
हेमंत पटले - (भाजप) - 2,02,138


मताधिक्य - 24,839

बारावी फेरी

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 2,08,883
    
हेमंत पटले - (भाजप) - 1,88,300


मताधिक्य - 20,583

दहावी फेरी

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 1,62,287
    
हेमंत पटले - (भाजप) - 1,49,935


मताधिक्य - 12,352

LIVE : आठ फेऱ्यांनंतर भाजप उमेदवार हेमंत पटले 3193 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांना पिछाडी


सहावी फेरी


मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 1,02,000
    
हेमंत पटले - (भाजप) - 94,868


मताधिक्य - 7,132

पाचवी फेरी


मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 85,160
    
हेमंत पटले - (भाजप) - 80,131


मताधिक्य - 5,029

LIVE :  चौथ्या फेरीत राष्ट्रवादी 3959 मतांनी पुढे


तिसरी फेरी


मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 51219
    
हेमंत पटले - (भाजप) - 48382


मताधिक्य - 2,837

दुसरी फेरी


मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 35512
    
हेमंत पटले - (भाजप) - 33306

भारिप - 778

इतर - 448

मताधिक्य - 2206

पहिली फेरी


मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 18028
    
हेमंत पटले - (भाजप) - 17246

मताधिक्य - 782


LIVE : तिसऱ्या फेरीमध्ये राष्ट्रवादी 3100 मतांनी पुढे गेल्याची माहिती

LIVE : तिसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण, मात्र प्रशासनाकडून कोणत्याही आकडेवारीची घोषणा नाही

LIVE : तुमसर वगळता इतर पाचही विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपच्या हेमंत पटले यांना आघाडी

LIVE : तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पुढे

LIVE : पोस्टल मतांमध्ये भाजप पुढे

LIVE :  मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतांची मोजणी सुरु

नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पटोलेंनी 12 डिसेंबर 2017 रोजी दिलेला राजीनामा 14 डिसेंबर 2017 रोजी मंजूर झाल्यावर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

गोंदिया-भंडारा पोटनिवडणुकीत मतदानावेळी झालेला अक्षम्य घोळ, त्यानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, फेरमतदान, जिल्हाधिकाऱ्यांची उचलबांगडी यामुळे पोटनिवडणुकीची चुरस कमालीची वाढली आहे.

49 मतदान केंद्रावर फेरमतदान

भंडारा-गोंदियात मतदान यंत्रामध्ये बिघाड आणि घोळ झाल्याच्या आरोपानंतर काल (30 मे रोजी ) 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आलं. यात भंडारा विधानसभा मतदारसंघातील 14 केंद्रांवर, साकोली मतदारसंघातील 4 केंद्रांवर, अर्जुनी मोरगावमधील 2, तिरोडातील 8 आणि गोंदियातील 21 मतदान केंद्रांवर फेरमतदान झालं.

28 मे रोजी भंडारा-गोंदियासाठी मतदान झालं, तेव्हा अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होत असल्याचं लक्षात आलं. तसंच काही ठिकाणी मतदान उशीरा सुरु झालं. ज्यामुळे सगळी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्याची तक्रारही काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाकडे केली.

दरम्यान मतदानावेळी झालेल्या घोळामुळे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी कादंबरी बलकवडेंची नेमणूक कऱण्यात आली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास

तत्कालीन भाजप खासदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना जवळपास दीड लाख मतांनी हरवलं होतं. तिसऱ्या स्थानावर बसप होतं.

रिंगणातील उमेदवार

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.

भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी केली असली, तरी ही जागा काँग्रेसला जाईल आणि नाना पटोले उभे राहतील, अशी धारणा होती. मात्र राष्ट्रवादीने जागा सोडली नाही आणि प्रफुल्ल पटेल स्वतःही उभे राहिले नाहीत. मात्र दोघांनी अत्यंत जुनं वैर मिटवलं. दोघांनीही राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांच्यासाठी प्रचार केला.

राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे येऊन गेले, तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर जोर लावला आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा क्षेत्र असून त्यापैकी सहा भाजप, तर एक काँग्रेसकडे आहे.