Bhandara: कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडत गेली आणि उपचारादरम्यान दोन महिन्यांनंतर तिचा मृत्यू झाला . सदोष ऑपरेशनमुळे हा मृत्यू झाल्याचे सांगत संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह रस्त्यावर ठेवत रात्री उशिरापर्यंत आंदोलन केल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या विरली इथे घडलाय . महिलेचा ऑपरेशन करणाऱ्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांसह ग्रामस्थ करत होते . याप्रकरणी दोन डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयाकडेही पाठवण्यात आलाय .मेधा आकाश बनारसे (24) असं या मृत महिलेचं नाव आहे . या घटनेनंतर भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली होती . विरली गावात महिलेचा मृतदेह रस्त्यावर ठेवत ग्रामस्थ संतप्त होते. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी नागपूर मेडिकल कॉलेजचे पथक आज भंडाऱ्यात दाखल होणार आहे .भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मेडिकल कॉलेजची टीम महिलेने उपचार घेतलेल्या खाजगी रुग्णालयापासून शासकीय रुग्णालयापर्यंत सखोल चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी करणार असल्याची माहिती आहे .
नक्की प्रकरण काय ?
भंडारा जिल्ह्यातील विरली तालुक्यात राहणाऱ्या मेधा बनारसे या महिलेने 16 नोव्हेंबर रोजी सरांडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कुटुंब नियोजनांतर्गत शस्त्रक्रिया केली . या शस्त्रक्रियेनंतर महिलेला प्रचंड वेदना होऊ लागल्या . त्यामुळे कुटुंबीयांनी तिला जिल्ह्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले . मेधावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली . आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या कुटुंबीयांनी 18 जानेवारी रोजी खाजगी रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मेधाला दाखल करण्यात आले . मात्र उपचारादरम्यान मेघाचा मृत्यू झाला .या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी मेघाचा मृतदेह रस्त्यावर ठेवत रात्रभर आंदोलन केले आहे . कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच कुटुंबीयांनी उपोषण आंदोलन मागे घेतले .
डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियानंतर मेघा बनारसे या महिलेची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा दोन महिन्यानंतर मृत्यू झाला. यामुळं संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तिचा मृतदेह रविवारी दुपारी रस्त्यावर ठेवून रात्री उशिरापर्यंत आंदोलन केल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या विरली इथं घडला. याप्रकरणी दोन डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयाकडं पाठविण्यात आला आहे. या दोन डॉक्टरांमध्ये विरली प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रसुरेश डोंगरवार आणि प्रसुतीतज्ञ डॉक्टर रोशनी राऊत या दोघांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हा प्रस्ताव मंत्रालयात काल पाठविला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी नागपूर येथील मेडिकल कॉलेजचं पथक आज भंडाऱ्यात दाखल होत आहे. भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली मेडिकल कॉलेजची ही टीम महिलेने उपचार घेतलेल्या खाजगी रुग्णालयापासून ते शासकीय रुग्णालयातील संपूर्ण चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद श्यामकुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.