बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणे असे प्रकार सर्रास होत असतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांचे चन्नमा पथक सज्ज झाले आहे. महिलांचे संरक्षण हीच आपली जबाबदारी असे ब्रीदवाक्य या चन्नमा पथकाचे आहे.
महिलांची, तरुणींची वर्दळ असलेल्या ठिकाणी हे पथक कार्यरत असणार आहे. एका पथकात एक पीएसआय आणि चार महिला पोलीस असणार आहेत. गुन्हे तपास विभागाचे एसीपी हे नोडल अधिकारी असणार आहेत. केवळ रोडरोमिओंचा बंदोबस्त करणे एवढीच यांची जबाबदारी नसून महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे कार्य देखील हे पथक करणार आहे.
या पथकाची मदत घेण्यासाठी 100 क्रमांकावर संपर्क करावा लागणार आहे. महिलांना कुठेही फिरताना सुरक्षित वाटावे, त्यांना सगळीकडे मोकळेपणाने वावरता यावे, त्यांना सन्मान मिळावा म्हणून हे पथक कार्यरत राहणार आहे.
महिला आणि तरुणींवरील वाढते गुन्हे लक्षात घेऊन बेळगाव पोलीस दलाने चन्नमा पथकाची स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बेळगावच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. सीमा लाटकर यांच्या देखरेखीखाली या महिला पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. हे पथक सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहे.
खरंतर महिलांवर अत्याचार झाले किंवा त्यांची सुरक्षितता धोक्यात आली तर सगळ्यात आधी पोलिसांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे बेळगावच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर चन्नमा पथकाची स्थापना केली.
महिलांची छेड काढणाऱ्यांविरुद्ध बेळगाव पोलिसांचं 'चन्नमा' पथक सज्ज
विलास अध्यापक, एबीपी माझा
Updated at:
13 Feb 2020 01:06 PM (IST)
तरुणींची, महिलांची छेडछाड करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, कारण महिला पोलिसांचे विशेष प्रशिक्षण घेतलेले चन्नमा पथक सगळीकडे लक्ष ठेवून असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -