Maharashtra Ekikaran Samiti and two ex minister of Maharashtra : महाराष्ट्र एकीकडे समितीला बेळगावमध्ये मेळावा घेण्यापासून थांबवले जात आहे. याबाबत आता महाराष्ट्र विधीमंडळात पडसाद उमटले आहेत. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. दरम्यान, आता महाराष्ट्रातील दोन माजी मंत्री सीमा भागात जाणार आहेत. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाच आता महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांनी सीमा भागात जाण्याचा निर्णय घेतला. सीमाभागातील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेचा प्रस्ताव दिला जाणार आहे. या प्रस्तावानंतर 12 डिसेंबर रोजी दोन माजी मंत्री चर्चेसाठी जाणार आहेत. 


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळात छोटेखाणी सभा होणार आहे. चर्चेत सिमाभागातील तणाव कमी करण्याचा  प्रयत्न राहणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिली बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


2004 सालापासून बेळगाव मध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत असते... याच अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिक बेळगावमध्ये महामेळावा घेत असतात...या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये महामेळावा घेण्याचे ठरवले...मात्र या ठिकाणी येणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी ठेवलं आहे..


ठाकरे गटाचा राज्यपालांच्या अभिभाषणावर  बहिष्कार 


ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू म्हणाले, आज राज्यपालांच्या अभिभाषणावर  आमच्या पक्षाने बहिष्कार टाकला आहे. बेळगाव कारवारमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे.  महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा.   राज्यपालांनी यादीच्या भाषणांमध्ये सुद्धा या गोष्टी बोलून दाखवले आहेत. मात्र अन्याय काय कमी झाला नाही. महाराष्ट्र एकीकडे समितीला तिथे मेळावा घेण्यापासून थांबवले जाते.  


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे.  सरकार कोणाचे असू दे आम्ही त्या ठिकाणच्या मराठी माणसाच्या बाजूने आहे.  आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर  बहिष्कार टाकत आहोत.  प्रत्येक वेळी राज्यपाल अभिभाषणामध्ये सांगतात की हा प्रश्न आम्ही सोडूवू.. मात्र प्रश्न सोडवला जात नाही आणि जनतेची फसवणूक होते. गरज पडल्यास आमची शिवसेना बेळगाव कारवार मध्ये मराठी माणसासाठी जाईल. वेळ आली तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा बेळगाव कारवारमध्ये जाऊ शकतात , असा इशाराही प्रभू यांनी दिला.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Rohit Patil On Devendra Fadnavis: रोहित पाटलांनी गोड गोड बोलत मुख्यमंत्र्यांना टाकली गुगली; देवेंद्र फडणवीसांना हसू अनावर, VIDEO