बडोदा : 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप संध्याकाळी पार पडला. यावेळी अध्यक्षीय समारोप कार्यक्रमप्रसंगी सीमावासियांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
या समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी काही ठराव देखील घेण्यात आले. मात्र, त्यात बेळगावचा मुद्दा नसल्यानं उपस्थितांनी घोषणाबाजी केली.
त्यानंतर बेळगावसह मराठी प्रांत महाराष्ट्रात सामिल होऊ शकतो. त्यासाठी सरकारवर दबाव टाकला पाहिजे, असं देशमुख म्हणाले. त्याचबरोबर मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील प्रकरणात सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात सीमावासियांकडून घोषणाबाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Feb 2018 10:22 PM (IST)
91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप संध्याकाळी पार पडला. यावेळी अध्यक्षीय समारोप कार्यक्रमप्रसंगी सीमावासियांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -