कोल्हापूर: देशात भाजपने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, लोकांनी त्याला झिटकारलं. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातोय, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ते कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करत होते. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशात भाजपने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, लोकांनी त्याला झिटकारलं. हिंदूहृदयसम्राट म्हटल्यावर लोकांच्या समोर एकच नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला जाणारा म्हणजे हिंदूहृदयसम्राट होय. भाजपचा भगवा हा खरा भगवा नाही, नकली भगव्याचा बुरखा हा फाडायला हवा."


नवी मुंबई एअरपोर्टला नाव देताना बाळासाहेबांच्या नावाला का विरोध केला असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला. समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव महाविकास आघाडी सरकारने दिलं आहे असं ते म्हणाले. 


शिवसेनेने कधी झेंडा बदलला नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 1966 साली शिवसेना जन्माला आली. तेव्हापासून शिवसेनेने कधी झेंडा, रंग किंवा नेता बदलला नाही. तुमच्या सोयीप्रमाणे भगवा वापरालं तर खरा भगवा नव्हे. हिंदुत्वाची दिशा बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली होती. आता कुठं अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी पोस्टरवर दिसतात का? सगळीकडे फक्त एकच फोटो दिसतो. 


बेळगावमधला भगवा यांनी खाली उतरवून नकली भगवा चढवला. खोटं बोलून चार राज्यात तुमचं चाललं असेल...पण इथं नाही चालणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. 


येत्या 12 तारखेला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी मतदान आहे. त्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 


महत्त्वाच्या बातम्या :