बीड : वेगवेगळ्या पुरुषांसोबत मैत्री करायची, त्यांच्या सोबत जवळीक साधायची आणि नंतर त्याच पुरुषांना लैंगिक अत्याचार केल्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचे. हे कृत्य करणाऱ्या एका महिलेच्या विरोधात बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून ती पोलीस कोठडीत असताना तिच्याविरोधात आणखी एक फसवणूकीचा गुन्हाही धारूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
संबधित महिलेने लैंगिक अत्याचार केल्याची खोटी धमकी देऊन एका चालकाला एक लाख रुपयांना लुटल्या प्रकरणी केजच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनंतर संबधित महिलेला अटक केली. तिला केजच्या न्यायालयासमोर हजर केले असता 7 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र ही महिला पोलिस कोठडीत असतानाच तिच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यातील सहशिक्षक बाजीराव चौरे आणि या महिलेचे मैत्रीपूर्ण संबंध होते. तूनच 9 सप्टेंबर रोजी चौरे यांना घेऊन ही महिला धारूर या ठिकाणी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली. त्या ठिकाणी या महिलेचे साथीदार अशोक मिसाळ आणि इतर अनोळखी चार जणांनी बाजीराव चौरे यांना या महिलेसोबत अश्लील चाळे करायला लावले आणि तिच्यावर प्रेम आहे असे त्याच्याकडून वदवूनही घेतले. हा सर्व प्रकार त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला ज्यानंतर संबधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याची पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देत दहा लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर हा घडलेला सर्व प्रकार बाजीराव चौरे यांनी सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना सांगितला. महिला आणि अनोळखी व्यक्तींकडून वारंवार त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. त्यामुळे त्यांनी सदर महिलेविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या या महिलेनं आणखी किती लोकांना दिले आहेत याचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान सदर प्रकरणांमध्ये या महिलेला केज न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा -
- रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, रिक्षा चालकासह तिघांना अटक, हडपसर परिसरातील धक्कादायक घटना
- Pune Crime : पाळत ठेवून तब्बल 30 घरफोड्या करणारा गुन्हेगार गजाआड, पुणे गुन्हे शाखेची कारवाई
- Pune : कुत्र्यावरुन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी, वाद पोलीस ठाण्यात अन् तरुणीचा पोलिसांसमोरच गोंधळ
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live