Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. आवाजा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी मोठा झटका बसला . संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवत वाल्मीक कराडांवर मोक्का ( MACOCA ) लावण्यात आला .  यानंतर परळीत काल तणावाची स्थिती होती . कराड समर्थक आक्रमक झाले होते . मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज वाल्मीक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे . या पार्श्वभूमीवर आज परळीत तणावपूर्व शांतता आहे . परिस्थिती संवेदनशील असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय .


मोक्का लावल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर


मंगळवारीही वाल्मीक कराडला केज न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते .यावेळी खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडची पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळत वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी दिली .  खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असती तरी जामीन मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला खूप यातायात करावी लागेल कारण आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. एखाद्या गुन्हेगारावर मकोका लागतो, तेव्हा बहुतांश काळ हा न्यायालय आणि कोठडी यामध्ये जातो.  संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार आहे . या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे . पोलिसांकडून वाल्मीक कराडच्या भोवतीचा चौकशीचा फासही आवळला जातोय . त्यामुळे वाल्मीक कराडची सुटका होणे अवघड आहे . वाल्मीक कराडची राज्य बाहेर कुठे संपत्ती आहे याचाही तपास बाकी आहे..


वाल्मिक कराडवर मकोका लावला


संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता. मात्र त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर आता वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे.  दरम्यान, वाल्मिक कराडला आज पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात येणार असून परळीत तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून शहरातील परिस्थिती संवेदनशील आहे.


हेही वाचा:


Walmik Karad Mcoca: सहा फोन कॉल्सने वाल्मिक कराड अडकला; मकोका लागल्याने पुरता फसला, नेमकं काय घडलं?