बीड: केमिकलपासून दूध बनवून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकास बीड पोलिसांनी छापा टाकून रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पाटोदा येथे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकज कुमावत यांच्याकडून बीड जिल्ह्यातील अनेक अवैध धंद्यांवर धडक कारवाई केली जात आहे आणि त्यापैकीच एक या बनावट दुधाच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे


पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी येथील आप्पासाहेब थोरवे हे केमिकलपासून दूध तयार करायचे आणि या दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री करत होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला आणि यावेळी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पावडरची तपासणी केली असता हे पावडर बनावट असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर हरिभाऊ थोरवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल असून 160 लिटर दुधासह 49 हजार रुपयांचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे.  


विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून हरिभाऊ थोरवे हा आपल्याकडे असलेल्या गाई म्हशीच्या दुधामध्ये बनावट दूध पावडर मिक्स करायचा आणि त्यानंतर या दुधवची विक्री दूधडेरी आणि किरकोळ ग्राहकांना केली जायची गेल्या काही दिवसापासून त्याचा हा दूध बनावटीचा व्यवसाय सुरू होता आणि याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संयुक्त कारवाई केली त्यानंतर पांढऱ्याचा काळा धंदा उघड झाला आहे.


बीडमध्ये गेल्या काही दिवसापासून अवैध धंद्यांना ऊत आल्याने याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते आणि त्यानंतर आता पोलीसांनी अनेक ठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यातच पंकज कुमावत यांच्या पथकाने गेल्या काही दिवसापासून अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला असून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


ABP Majha