मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या  (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून  आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 892 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.आज राज्यात 275   रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात  346  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज  दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज  दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24, 560  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 91, 56, 002  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  892 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 892 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत  248  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 157 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.


देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट 


देशामध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus)चा प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज कोरोनाचे आकडे कमी झाल्याचं दिसत आहे.मागील 24 तासात कोरोनाचे नवीन 1685 रुग्ण समोर आले आहेत तर 83 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. काल देशात 1938 केसेस समोर आल्या होत्या तर 67 लोकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशात  2 हजार 499 लोक कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 21 हजार 530 वर आली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 5 लाख 16 हजार 755 मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 4 कोटी 24 लाख 78 हजार 87 कोरोनातून संसर्गमुक्त झाले आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha