बीड : बीडच्या लवूळ गावात भरदिवसा वानरांची दहशत पाहायला मिळते आहे. ग्रामस्थांना घराच्या बाहेरही पडता येत नाही अशी अवस्था गावकऱ्यांची झालीये. गावातील वानरांनी कुत्र्यांच्या पिल्लांना मारलं. आतापर्यंत शंभर पिल्लांचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून गावाला दोन वानरांनी पुरतं बेजार करून सोडलंय. रस्त्यावरुन चालणाऱ्यांवर हल्ले करत आहेत. वानरांच्या या हल्ल्यात अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. तर भटकी कुत्री आणि वानरांमध्ये जुंपली आहे आधी कुत्र्यानं वानराचं एक पिल्लू मारलं त्यानंतर सुडानं पेटलेल्या वानरांनी कुत्र्यांची पिल्ले संपवण्याचा विडा उचलला आहे.
एखाद्या वानराने कुत्र्याच्या पिल्लांना उचलून नेले की ते, घराच्या छतावर नेऊन ठेवतात. मग कुत्र्यांच्या पिल्लांना पाणी मिळतं नाही. अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे आतापर्यंत शंभर पिल्लांचा मृत्यू झाल्याचे गावकरी सांगत आहेत. या वानराचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे. मात्र त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही. चोर-पोलिसांसारखा खेळ गावकरी आणि वानरातं सुरू असतो. ही वानरं कुठे आहेत? बघायचं आणि आपला रस्ता बदलायचा असा ग्रामस्थांचा दिनक्रम झाला आहे. या वानराचा बंदोबस्त करणार तरी कधी? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप
- क्रुझ पार्टीतील 'त्या' तीन लोकांना सोडण्यातच सर्वात मोठा खेळ; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट
- नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...
- माकडाने रुग्णवाहिकेची चावी काढून घेतली, अर्धा तास खोळंबा, मग लढवली 'ही' शक्कल!
- 'आम्ही दोघे मित्र...', आईपासून दुरावलेलं माकडाचं पिल्लू अन् हरणाच्या पाडसाची जिगरी दोस्ती