परभणी : कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण हे एक मोठे हत्यार असताना अजूनही काही ठिकाणी लसीकरणाला गंभीररित्या घेत नसल्याचं समोर येत आहे. त्यामुळे शासन आता कठोर पावलं उचलू लागलं आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक गावात अजूनही लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टांकसाळे यांनी 37 ग्राम पंचायतीच्या सरपंचांना नोटीसा धाडल्या आहेत. यावेळी लसीकरण वाढवा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून नागरिकांचा बचाव व्हावा, या हेतूने जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद आदी प्रशासकीय यंत्रणा सर्वोत्परी प्रयत्न करत आहेत. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेत सरपंचानी गावातील नागरिकांना प्रोत्साहित करून लसीकरणाची मोहीम यशस्वी पार पाडण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याच अनुषंगाने ज्या ग्रामपंचायतीमधील सरपंचांनी लसीकरणाच्या मोहिमेत कमी सहभाग नोंदवला अशा 37 ग्रामपंचायतींच्या सरपंचांना परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे. ज्यात शासनाचे निर्देश असू कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेत सोपविण्यात आलेल्या जबाबदारीमध्ये कमी पडल्याने पाच दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश सदर नोटीशीत दिले गेले आहेत. महत्वाचे म्हणजे यापुढे देखील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेत जे सरपंच सक्रिय सहभाग घेणार नाहीत, त्यांच्या विरुद्ध सरपंचपदाच्या जबाबदारीत आणि कर्तव्यात कमी पडल्या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39 (1) नुसार कारवाई प्रस्तावित करणार असल्याचे ही टाकसाळे यांनी सांगितले. 


परभणीच्या नऊ तालुक्यातील सरपंचांना नोटीसा बजावल्या आहेत. या गावांमध्ये परभणी-हिंगला, उखळद, हसनापूर, सहजपुर जवळा, सावंगी खु., जिंतूर-शेक, सोरजा, राजेगाव, जुणूनवाडी, पोखर्णी, माक पाथरी-फुलारवाडी, जैतापूरवाडी, टाकळगव्हान, पूर्णा-बेगाव,शिरकळस, एकरुखा, कमलापूर, सेलू-हट्टा, राजुरा, नांदगाव, राव्हा, कुंभारी मानवत-टाकळी नि., रत्नापुर, सावळी गंगाखेड-नरळद,शेंडगा, झोला, बनपिंपळा, पालम-गुळखंड, पोखर्णी देवी, नाव्हलगाव,  दुटका, सोनपेठ-थडी पिंपळगाव, खपाट पिंपरी, निमगाव.  या गावांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha