Beed: ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड जिल्हा कारागृहात असलेल्या सुरेश कुटे यांची अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीने तीन दिवस चौकशी केल्याची माहिती समोर येतेय. मागील आठवड्यात ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या विविध शाखांवर छापे टाकले होते. सुरेश कुटे यांनी ठेवीदारांचे पैसे हॉंगकॉंग ला नेल्याचे ईडीच्या तपासातून समोर आल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारागृहात जाऊन कुटेंची कसून चौकशी केल्याचं कळतंय. ठेवीदारांचे पैसे हॉंगकॉंग ला कसे नेले याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले असून या चौकशीला कारागृह प्रशासनानं दुजोरा दिलाय. 


खातेदारांचे पैसे नेले हाँगकाँगला


ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या सुरेश कुटे याची ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीने तीन दिवस चौकशी केल्याची माहिती समोर आली. गत आठवड्यातच ईडीने ज्ञानराधाच्या विविध शाखांवर छापे टाकले होते. सुरेश कुटे याने ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले होते. आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारागृहात जाऊन कुटेला हे पैसे हाँगकाँगला कसे नेले याबाबत माहिती विचारली. या चौकशीला कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे.


या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्हे


मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. या प्रकरणात या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत. 


ठेवीदारांचे पैसे देणार असल्याचा दावा


दरम्यान परदेशातून दहा हजार कोटींची गुंतवणूक आल्यानंतर ठेवीदारांचे पैसे दिले जाणार असल्याचा दावा सुरेश कुटे करतायेत. अटके नंतर ही कुटेंच्या वकिलांनी न्यायालयात हीच माहिती देऊन हे पैसे येण्यासाठी ची प्रक्रिया करण्यासाठी होम अरेस्ट ची मागणी केली होती.