Beed Accident: बीडच्या अंबाजोगाईजवळील लातूर रोडवरील वाघाळापाटी येथे ट्रक आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण ठार झाले असून इतर दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. अद्याप मृत्तांची नावे समजू शकलेले नाही. अंबाजोगाई लातूर रोडवर पहाटे ट्रकच्या धडकेने कारचा चुराडा झाला असून इंजिनासकट कार चेपली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातानंतर परिसरात खळबळ होती. भरधाव वेगात निघालेल्या कारला समोरून ट्रकची धडक बसल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
लातूर रोडवर ट्रकची कारला जबर धडक
बीडच्या अंबेजोगाई जवळ लातूर रोडवर वाघाडपाटी येथे ट्रकची कारला जबर धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की कार इंजिनासकट चेपली. कारमध्ये असणाऱ्या चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात काही जण जखमीही झाल्याचे वृत्त असून जखमींवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी पहाटे हा अपघात झाला असून या अपघातात कारचा चुराडा झाला. यावेळी परिसरातील नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. घटनेत दोन जण जागीच गेल्याने मोठी खळबळ उडाली असून मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. या अपघाताचा तपास सुरु झाला असून जखमींवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत कुर्ला अपघातात 5 मृत्यू, 35 गंभीर जखमी
मुंबईतल्या कुर्ला बेस्ट अपघातात (Kurla Best Bus Accident) 5 जणांचा मृत्यू झाला आहे. काल (9 डिसेंबर) रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की यात 5 जणांचा मृत्यू झालाय. 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरार-
सदर बसने 7 ते 8 गाड्यांना उडवलं. यामध्ये दोन ते तीन रिक्षा होत्या. त्यानंतर दोन टेम्पो आणि गाड्यांना उडवत बस मार्केटमध्ये घुसली. कितीजण जखमी झाले याबाबत माहिती नाही, पण अपघात झाला तेव्हा एक महिलेचा जागेवरच मृत्यू झाला होता. ती महिला बस आणि एका गाडीच्यामध्ये अडकल्याने तिचा मृत्यू झाला. काही मुलांना लगेच बाहेर काढलं. त्यानंतर मार्केटजवळ दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, असं प्रत्यक्षदर्शी अजीम अन्सारी यांनी दिली.