Beed Latest Update: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील (Gevrai Taluka Abortion) बकरवाडी येथे झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणी (Beed Abortion Case) एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात आता एक नवा खुलासा झाला असून महिलेच्या गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आणि उपजिल्हा रुग्णालयातील गोळ्याचा बॅच क्रमांक एकच असल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीतून समोर आला आहे. या गर्भपात प्रकरणात मनीषा सानप या अंगणवाडी सेविकेला पोलिसांनी गेवराईतून अटक केली होती. मनीषा सानप हिच्याकडे गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्याचा बॅच क्रमांक आणि उपजिल्हा रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या गर्भधारणाच्या गोळ्याचा बॅच क्रमांक एकच आढळून आल्याने बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणानंतर आता औषध प्रशासनाने बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र लिहून गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयासह इतर आरोग्य केंद्राची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
बीडच्या (Beed Illegal Abortion) बकरवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपात प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. अतिरक्तस्त्रावामुळे सीता गाडे या महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर तपास सुरु असतानाच या गर्भपात प्रकरणी ज्या नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला त्या नर्सचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.
बीडमध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय
बीडमध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय झाल्याच्या संशयावरून पोलिस, आरोग्य विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल तपास करायला सुरुवात केली आहे. पोलीस तपासामध्ये या प्रकरणी मुलीच्या गेवराई मधील एका महिला एजंटला अटक करण्यात आली होती. याच एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सकाळी बीड शहरातील नर्स असलेल्या सीमा सुरेश डोंगरे आणि मृत महिलेच्या पाच नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला होता.
आपल्यावर गुन्हा दाखल झाला हे कळल्यानंतर नर्स असलेल्या सीमा डोंगरे फरार होत्या. पोलिस त्यांचा शोध घेत असतानाच बीड ग्रामीण पोलिसांना पालीच्या बिंदुसरा धरणामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाची चौकशी केली असता हा मृतदेह गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या सीमा डोंगरे यांचा असल्याचं निष्पन्न झालं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणाला वेगळं वळण, आरोपी असलेल्या नर्सचा मृतदेह सापडल्याने खळबळ