नागपूर : गंभीर आजार किंवा मोठ्या अपघातामुळे महिनोन्महिने अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांकरिता अत्यंत उपयुक्त असा अत्याधुनिक बेड तयार केला आहे. नागपुरातील व्हीएनआयटी (विश्वेश्वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी महाविद्यालय) च्या यांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ अतुल अंधारे आणि त्यांच्या पीएचडीच्या एका विद्यार्थ्याने हा बेड बनवला आहे. 'बेड विथ कमोड एन्ड साईड टर्निंग' असं रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या अत्याधुनिक बेडचं नाव आहे. अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांच्या दृष्टीनं हा खास बेड अतिशय फायदेशीर ठरणारा आहे.


असाध्य आजाराने ग्रस्त रुग्ण किंवा मोठा अपघात घडल्यानंतर गंभीर जखमी व्यक्ती अनेक महिने अंथरुणावर खिळतात. या रुग्णांच्या शुश्रूषा करण्यासाठी एक व्यक्ती सतत उपस्थित असतो. मात्र, गंभीर दुखापत वा असाध्य आजारामुळं अशा रुग्णाच्या विविध क्रिया करून घेणे. शारीरिक स्वास्थ्यासाठी बेडवरच आवश्यक हालचाली करून घेणे आवश्यक ठरतात. मात्र, त्या तेवढ्याच त्रासदायकही असतात. कारण अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची हालचाल करताना त्याला दुखापतीसह वेदनाही होऊ शकतात. रुग्णांच्या याच वेदना आणि त्यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तींची अडचण लक्षात घेऊन नागपूरच्या विश्वेश्वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजेच व्हीएनआयटी मधील प्राध्यापक डॉ अतुल अंधारे आणि त्यांचे पीएचडीचे विद्यार्थी अनिल ओंकार यांनी अशा रुग्णांसाठी खास असा अत्याधुनिक बेड तयार केला आहे. या खास यांत्रिक बेडमुळे रुग्णाला त्याच्या सर्व दैनंदिन क्रिया सहज पार पाडता येणे शक्य होणार आहे..


पीएचडी करणारे विद्यार्थी अनिल ओंकार हे स्वतः ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईचा अपघात झाल्याने त्या अनेक महिने अंथरुणाला खिळून होत्या. त्यांची सुश्रुषा करताना अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची शुश्रूषा किती कठीण असते. खासकरून रुग्णाच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे एका व्यक्तीला शक्य नसतात. शिवाय अनेक दिवस एकाच कळ वर असलेल्या रुग्णांना ‘बेडसोल’ सारख्या समस्या निर्माण होत असतात. तसेच रुग्णांची चादर नियमित बदलणे, त्यांचा कूस बदलण्याची ही आवश्यकता असते. आईची सुश्रुषा करताना अनिल ओंकार यांच्या लक्षात या सर्व समस्यां आल्या आणि त्यांनी भविष्यात अंथरूळाला खिळलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी खास बेड तयार करण्याचा निर्धार केला. कधीकाळी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्हीएनआयटी महाविद्यालयाच्या प्राध्यपकांशी भेटून याच विषयावर पीएचडी सुरु केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर प्राध्यापक अतुल अंधारे आणि अनिल ओंकार यांनी बेड विथ कमोड एन्ड साईड टर्निंग संकल्पना साकारली.


बेड विथ कमोड अँड साईड टर्निंगचे वैशिष्ट्यं
#अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची शुश्रूषा करताना त्यांना न हलविता सर्व क्रिया पार पाडता येणे शक्य


# बेडमध्ये ‘कमोड अटॅच’असून फ्लशिंगची सोय आहे..


# बेडवर रुग्णाच्या क्रिया आटोपल्यानंतर कमोड दिसू नये अशा पद्धतीने ॲडजस्ट करता येतो..


# हा बेड आवश्यकतांनुसार चेअरमध्ये कन्व्हर्ट होतो...


# रुग्णाच्या जेवणाकरिता टेबल, जवळच अटॅच वॉश बेसिन आहे...


# तर औषध व इतर आवश्यक वस्तूंसाठी ॲडजस्टेबल रॅक ही आहे..


# रुग्णाला कुस बदलता यावी यादृष्टीने खास मेकॅनिझम...


# या बेडवरील मॅकेनिझममुळे रुग्णांचा आवश्यक व्यायाम ही करता येतो..


गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी हा अत्याधुनिक बेड जणू वरदानच ठरणार आहे. अनिल ओंकार यांनी याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्याचे ठरविले असून त्याचे पेटंट ही ते घेत आहेत. विविध जिल्हा पातळीवर तरुणांच्या हटवला रोजगार देऊन स्थानिक पातळीवर या बेची निर्मिती शक्य होईल का यासाठी ही त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. एकूणच अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांसाठी आणि त्यांची सुश्रुषा करणाऱ्या कुटुंबीयांसाठी हा खास बेड आरामदायी आणि उपयुक्त आहे.