पुणे : सध्या राज्य भरात कांदा लागवड सुरु आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकरी संदीप घोले या शेतकऱ्यांने कांद्याची नवीन जात शोधून काढली आहे. त्याला कांद्याच्या वाणाचे नाव आहे 'संदीप कांदा'. संदीप कांदा या वाणाची टिकवण क्षमता सात ते आठ महिने इतकी आहे. सोबतच याची रोगप्रतिकारक क्षमता देखील जास्त आहे. या संशोधनासाठी संदीप घोले यांना 2019 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
संदीप घोले हे सर्वसामान्य शेतकरी
संदीप घोले हे दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकरी आहेत. कांदा लागवड सुरु असताना अनेकांची बियाणे खरेदी करताना फसवणूक केली जाते. निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना विकले जाते. संदीप घोले या या शेतकऱ्यांने स्वतःच्या नावाची कांद्याची जात शोधून काढली आहे.
जेव्हा संदीप घोले शेती करायला लागले तेव्हा कांदा टिकवण्यासाठी अडचणी येऊ लागल्या. कांदा लवकर खराब व्हायचा. त्यावर पर्याय म्हणून त्यांनी आठ वर्षे संशोधन केले आणि संदीप कांदा या वाणाची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात हेक्टरी 7 ते 8 टनाचा फरक पडला आहे.
संदीप कांदा ही कांद्याची जात शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याने आठ राज्यातील जवळपास एक हजार पेक्षा जास्त शेतकरी त्यांना जोडले गेले आहेत. त्यामुळे बाकी शेतकरी देखील संदीप कांदा या वाणाची लागवड केली आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादन वाढले सोबतच उत्पादन खर्च देखील कमी झाला आहे.
संदीप कदम यांच्या कामाची दखल नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने घेतली. आणि 2019 साली त्यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संदीप प्याज हा इतर कांद्या पेक्षा तीन ते चार महिने जास्त टिकतो. त्यांमुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. संदिप घोले यांनी केलेलं कांद्याचं संशोधन हे आगामी काळात शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. कारण सध्या गुणवत्तापूर्ण मालाला जास्त महत्त्व आहे.
महत्त्वाच्या बातम्या :