मुंबई : प्रचंड संभ्रमावस्था आणि ताठर भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) समावेश होणार की नाही याची चर्चा अजूनही सुरुच आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने घेतली जाणारी ताठर भूमिका महाविकास आघाडी सामील करण्यासाठी अडचणीचा ठरत असल्याचे बोलले जात असतानाच आज (6 मार्च) महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी पोहोचले. या भेटीचा तपशील समोर आला नसला, तरी काँग्रेस आणि वंचितचा चार जागांवर क्लॅश होत असल्याने तोडगा काढण्यासाठी भेट घेतल्याची चर्चा आहे. 


'या' चार जागांवर वंचित आग्रही??


वंचितला आगामी लोकसभेला (Loksabha Election 2024) अकोला, सोलापूर, सांगली आणि नांदेड या जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला (Congress) सुटल्या आहेत. त्यामुळे या जागांवर चर्चा करण्यासाठी ही भेट होती का? अशी चर्चा आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीची वरळीतील फोर सिझन हॉटेलला आज दुपारी एक वाजता महाविकास आघाडीची बैठक होत आहे. प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा बैठकीचा निमंत्रण दिलं असल्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माहिती दिली असली, तरी या बैठकीला ते उपस्थित राहणार का? अशीही चर्चा आहे. कारण वंचित बहुजन आघाडी संदर्भातच आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत अनिल देशमुख सुद्धा उपस्थित राहणार आहेत. 


महाविकास आघाडीमध्ये जागावाटप निश्चित असले, तरी वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातील अजूनही काथ्याकूट सुरूच आहे. वंचितकडून अजून कोणत्याही प्रकारे स्पष्ट भूमिका केली जात नसल्याने नेमक्या त्यांना कोणत्या जागा हव्या आहेत या संदर्भात माहिती समोर आलेली नाही. मात्र, अकोला, सोलापूर, सांगली आणि नांदेड या जागांसाठी वंचित आग्रही असल्याचे समजते. दरम्यान या सर्व जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला सुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला चार जागा सोडण्यासाठी शरद पवारांनी तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर त्यांनी सोबत आल्यास महादेव जानकर यांना सुद्धा माढाची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या