Beed Crime News : संपत्तीच्या वादातून नातवानेच आजोबाचा धारदार शस्त्राने वार करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना बीडच्या (Beed) केज तालुक्यातील कानडी रोडवर घडली आहे. गिरधारी किसनलाल शिल्लक (वय 60 वर्ष) असं हत्या करण्यात व्यक्तीचे नाव असून, त्यांचाच नातू रोहित रतन शिल्लक ( 25 वर्षे. रा.केज) याने त्यांच्यावर धारदार शास्त्राने वार करून जीव घेतला आहे. नातवाने केलेल्या हल्ल्यात गिरधारी यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपी रोहित शिल्लक हा स्वतः केज पोलिसात हजर झाला. त्याने आपण आजोबाचा खून केल्याची कबुली देताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरधारी शिल्लक आणि रतन शिल्लक या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यापासून संपत्तीचा वाद होता. याच वादातून त्यांच्यामध्ये नेहमी शाब्दिक भांडण देखील व्हायचे. नेहमीप्रमाणे गिरधारी शिल्लक हे कानडी रोडवर असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी ते परत येत असताना वाटेत दबा धरून बसलेला त्यांचा नातू रोहित शिल्लक देखील तिथे पोहचला. त्याने अचानक गिरधारी शिल्लक यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ज्यात डोक्यावर आणि मानेवर वार करण्यात आले. यामध्ये गिरधारी शिल्लक हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


एकामागून एक 13 वार अन् खेल खल्लास...


गिरधारी किसनलाल शिल्लक आणि त्यांचा नातू रोहित रतन शिल्लक यांच्यात मागील काही दिवसांपासून संपत्तीचा वाद होता. यावरून यापूर्वी त्यांच्या अनेकदा वाद देखील झाल्याची माहिती मिळत आहे. अशात रोहित शिल्लक याला दारूचे प्रचंड व्यसन होते. मंगळवारी देखील रात्रीच्या सुमारास तो प्रचंड दारू पिऊन आला होता. त्यामुळे दारू पिणे बंद करत म्हणत गिरधारी शिल्लक यांनी त्याला शिवीगाळ केली होती. याच रागातून रोहितने पुन्हा दारू पिली, सोबतच गांजा देखील ओढला. त्यामुळे तो प्रचंड नशेत होता. याच नशेत त्याने आपल्या आजोबांवर हल्ला केला. यावेळी त्याने डोक्यावर आणि मानेवर एकामागून एक 13 वार केले. ज्यात गिरधारी यांचा जागीच मृत्यू झाला.


स्वतः पोलीस ठाण्यात हजर...


दारूच्या नशेत रोहितने आजोबांवर हल्ला केला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. गिरधारी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून होते. त्यानंतर रोहीतने थेट बीडमधील केज पोलीस स्टेशन गाठले. रक्ताने माखलेले हात, रक्ताने भरलेल्या कपड्यांसह त्याला पाहून पोलिसांना देखील नेमक काय घडले कळले नाही. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन, तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गिरधारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Washim Crime News : सरकारी जागेवरील अतिक्रमणाला विरोध बेतला जीवावर; भरदिवसा दस्तलेखकालाच संपवलं