Bail Pola : दोन दिवसांवर बैलपोळ्याचा (Bail Pola)सण आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी साहित्यांनी सजल्या आहेत. मात्र, यावर्षीच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचं सावट आहे. कारण राज्यातील बहुतांश भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडं पोळा सणावर लम्पी स्कीन आजाराचं सावट देखील आहे. दरम्यान, दिवसेंदिवस पशुधनाची संख्या घटत आहे. पशुधन घटण्याची नेमकी कारणं काय आहेत, तसेच राज्यातील पशुधनाची नेमकी स्थिती काय? याबाबतची सविस्तर माहिती ज्येष्ठ पशुवैद्यक नितीन मार्कंडेय सर यांनी दिली आहे. 


शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैलपोळ्याच्या सणाला विशेष महत्व आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या सणावर लम्पी स्कीन आजाराचं सावट आहे. तर दुसकरीकडं पावसाचं प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत असल्याचे नितीन मार्कंडेय म्हणाले. राज्याचा विचार केला तर सध्या पशुधनाची संख्या ही एक कोटी 39 लाख आहे. यामधील एक कोटी 10 लाख जनावरे ही वंशावळीची माहिती नसणारी असल्याचे मार्कंडेय म्हणाले. यातील 15 लाख जनावरे ही शुद्ध जातीची आहेत. तर उरलेली जनावरे 27 लाख जनावरे संकरीत आहेत. राज्यात म्हशींची संख्या ही 55 लाखांच्या आसपास असल्याची माहिती मार्कंडेय यांनी दिली. राज्यात सात प्रकारच्या अधिकृत नोंदणी असलेल्या गायींच्या जाती आहेत. 


बैलांचं प्रमाण का घटलं?


शेती क्षेत्रात दिवसेंदिवसं मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर सुरु झाला आहे. 
जातीवंत बैलांची पैदास कमी होऊ लागली, त्यामुळं शेती क्षेत्रातील बैलांची संख्या कमी होऊ लागली
शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रांवर सबसीडी दिली जात आहे, त्यामुळं बैलांची संख्या वाढली आहे.
बैलांकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, त्यामुळं आजारांचं प्रमाण वाढले
लम्पी स्कीन आजारामुळं गायींपेक्षा बैलांचा जास्त प्रमाणात मृत्यू झाला आहे. 


बैलांचं प्रमाण वाढवण्यासाठी काय करावं लागेल?


शेतात बैलांचा वापर वाढवावा लागेल. 
शुद्ध बैलांची पैदास करण्यासाठी चांगले वळू निर्माण करावे लागतील.  
शेतकऱ्यापर्यंत गोशाळा पोहोचायला हव्यात.
शेतकऱ्यांनी गोशाळा जगवाव्यात, गोशाळ्याने शेतकरी जगवावेत.
बैलांसाठी मोफत उपचार करावे
बैलांच्या संवर्धनासाठी काही योजना आखणं गरजेचं


दिवसेंदिवस शेतात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. त्यामुळं बैलांची संख्या कमी झाली आहे. शेतकरी शेतात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करु लागला आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांकडे बैलपोळा साजरा करण्यासाठी बैलच नसल्याची माहिती नितीन मार्कंडेय यांनी दिली. बैलांचा वापर वाढला तर जमिनीच सकपणा वाढेल असेही मार्कंडेय म्हणाले. 


दरम्यान, येत्या गुरुवारी 14 सप्टेंबरला बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र, यावर्षी लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये बैलांच्या मिरवणुकांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. साधेपणाने सण साजरा करा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन सण साजरा करवा असे आवाहन मार्कंडेय यांनी केलं. जनावरांना सम्री स्कीन आजाराची लागण झाली असल्यास औषधोपचार घ्यावेत, आयुर्वेदिक उपचार घ्यावेत असेही मार्कंडेय म्हणाले.  


महत्त्वाच्या बातम्या:


Bail Pola : बैल पोळा नेमका का साजरा केला जातो? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पोळ्याचं महत्व