मुंबई: अयोध्येच्या कार्यक्रमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना निमंत्रण (Ayodhya Ram Mandir Invitation List) पाठवलं जाणार आहे. याशिवाय वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि केंद्री मंत्री रामदास आठवले यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवलं जाणार आहे. राम जन्मभूमी न्यासाने ज्या निमंत्रण पत्रिका कुरिअर केल्या आहेत त्यामध्ये या सर्व नेत्यांनी नावं आहेत. 


येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी देशातल्या सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना निमंत्रणं दिली जाणार आहेत. यामध्ये आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले या महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रण पाठवलं गेल्याची माहिती आहे.


राम जन्मभूमीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना देण्यात आलं नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर ठाकरे गटाकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली होती. राज ठाकरेंनीही आपल्याला निमंत्रण आलं नसल्याचं म्हटलं होतं. आता या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्या ठिकाणी जाणार हा हे पाहावं लागेल. 


शरद पवार अयोध्येला जाणार नाहीत


राम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आलं आहे का आणि आलं तर काय करणार असा प्रश्न गुरुवारी शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले होते की, राम मंदिराच्या निर्मितीवर मी समाधानी आहे.  देव हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो. माझ्याही एक दोन ठिकाणी श्रद्धा आहेत, त्या ठिकाणी मी जात असतो. मला अद्याप अयोध्येचं आमंत्रण आलं नाही, आणि आलं तर मी जाणार नाही. अशा प्रकारे धर्माच्या आधारे राजकारण करणं योग्य नाही. 


अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुंबईतून निमंत्रित असलेल्या व्हीव्हीआयपीची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील संत महंत, राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष, खेळाडू, चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती काही महत्त्वाचे सेलिब्रिटीज यांना निमंत्रण दिले जाणार आहे. 


ही बातमी वाचा :