मुंबई  : येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. तसेच सीबीआयला अविनाश भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास मनाई कोर्टाने केली आहे. 


सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून  अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला होता. कोर्टाने हा दावा फेटाळला आहे.


अविनाश भोसले यांना अटक प्रकरण काय?



  • येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून याआधी चौकशी

  •  2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले

  •  वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप

  •  सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता

  • बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश

  •  ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त


कोण आहेत अविनाश भोसले?


अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


संबंधित बातम्या :


ED : कोविडचे कारण सांगत हजर राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीने बजावले नवीन समन्स


ED : अविनाश भोसलेंच्या 4 कोटी किंमतीच्या जमिनीवर ईडीची टाच, मनी लॉन्डरिंग प्रकरणी कारवाई